Divya Sreedhar Wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Divya Sreedhar Wedding : अभिनेत्रीने 38व्या वर्षी थाटला संसार, 49 वर्षाच्या बाबाशी केलं लग्न, व्हायरल फोटोमुळे खळबळ

Divya Sreedhar - Kriss Venugopal : मल्याळम अभिनेत्री दिव्या श्रीधर आपल्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ पाहा.

Shreya Maskar

मल्याळम इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री दिव्या श्रीधर (Divya Sreedhar ) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. दिव्या मल्याळम टीव्ही इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री आहे. दिव्याने 49 वर्षांच्या क्रिस वेणुगोपाल (Kriss Venugopal) यांच्याशी लग्न केले आहे. ३० ऑक्टोबरला यांनी लग्नगाठ बांधली.

दिव्या श्रीधर आणि क्रिस वेणुगोपाल या जोडप्याने 30 ऑक्टोबर रोजी मंदिरात लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर दोघेही मंदिराबाहेर स्पॉट झाले. त्यांच्या लग्नाची बातमी समजताच चाहत्यांनी आणि इतर कलाकरांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र दुसरीकडे आपल्यापेक्षा 11 वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याशी दिव्या श्रीधरने लग्न केल्यामुळे तिला ट्रोल देखील केले जात आहे.

दिव्या श्रीधर-क्रिस वेणुगोपाल यांची लव्ह स्टोरी

क्रिस वेणुगोपाल आणि दिव्या श्रीधर यांची पहिली भेट 'पतरामट्टू' या टीव्ही शोच्या सेटवर झाली. त्यानंतर यांच्यात छान मैत्री देखील झाली. कालांतराने मैत्रीचे रूपांतर हळूहळू प्रेमात झाले. त्यानंतर क्रिस वेणुगोपालने दिव्याला लग्नासाठी प्रपोज केले आणि आता गुरुवायुर मंदिर त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.

दिव्या श्रीधरच्या मुलांनी सांगितले की, "आई जर तू आमच्यासोबत असशील तर तुझ्या दुसऱ्या लग्नाला आमची काहीच हरकत नाही." क्रिसने केलेल्या प्रपोजवर दिव्या म्हणाली की, "पहिल्यांदा मला वाटले की क्रिस माझ्यासोबत फ्लर्ट करत आहे. तो माझ्यापेक्षा खूप मोठा अभिनेता आहे. नंतर मला कळले की तो लग्नाबाबत खूपच गंभीर असून त्याला माझ्याशी लग्न करायचे आहे. क्रिसच्या मोटिवेशनल क्लासला मी जात होते पण कधी त्याच्याशी लग्न करेन असे वाटले नव्हते."

दिव्या श्रीधरने मल्याळम आणि तमिळ टीव्ही मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्री दिव्या श्रीधर हिचे हे दुसरे लग्न आहे. त्यामुळे तिची या लग्नाला तिची मुलं देखील उपस्थितीत होती. तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. क्रिस वेणुगोपाल हे अभिनेत्यासोबतच एक उत्तम लेखकही आहेत. त्यांनी 'पुल्लू रायझिंग' या चित्रपटात काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

Aamir Khan Marriage : आमिरच्या लग्नाची तारीख ठरली, तिसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात?

SCROLL FOR NEXT