Malaika Arora Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora: पार्टीत 'नव्या' मिस्ट्री मॅनसोबत दिसली मलाइका अरोरा; रोमँटिक फोटोमुळे चर्चांना उधाण

Malaika Arora: मलायका अरोरा तिच्या नवीन रेस्टॉरंटच्या लाँच पार्टीमुळे चर्चेत आहे, जिथे ती मिस्ट्री मॅनसोबत नाचताना दिसली. हा व्हिडिओ व्हायरल झाला नंतर अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

Shruti Vilas Kadam

Malaika Arora: बॉलिवूडची छैय्या छैय्या गर्ल, मलायका अरोरा, तिच्या कामापेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि रिलेशनशिपसाठी जास्त चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वी, मलायकाचे नाव बिझनेस टायकून आणि हिरे व्यापारी हर्ष मेहताशी जोडले गेले होते. परंतु अलीकडेच आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे यामुळे नेटकरी थोडे गोंधळले आहेत. काल संध्याकाळी झालेल्या पार्टीतील मलायका अरोराचे अनेक व्हिडिओ समोर आले. यामध्ये ती एका मिस्ट्री मॅनसोबत नाचताना दिसत आहे. हा व्यक्ती हर्ष मेहता नसल्याने हा व्यक्ती कोण अशी चर्चा रंगली आहे.

सोराब बेदीसोबत व्हायरल व्हिडिओ

अलीकडेच, मलायकाचा एक व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. यामध्ये ती 'स्प्लिट्सव्हिला' फेम सोराब बेदीसोबत नाचताना दिसत आहे. या दोघांमधील काही तरी केमिस्ट्री असल्याचा अंदाज चाहते लावत असून सोराब हा मलायकाचा नवीन बॉयफ्रेंड आहे का अशा चर्चा रंगल्या आहेत. खरतर, सोराबने अलीकडेच मलायकाच्या नवीन रेस्टॉरंट 'स्वीनी बॉम्बे'च्या लाँच पार्टीला हजेरी लावली. सोराबने इंस्टाग्रामवर पार्टीचे फोटो शेअर केले आणि मलायकाला तिच्या नवीन कामाबद्दल अभिनंदन केले. यावरून हे स्पष्ट झाले की त्यांच्यात फक्त मैत्री आहे आणि व्हिडिओ फक्त एका पार्टीचा भाग होता.

मलायका तिच्या बॉयफ्रेंडसोबत होती

मलायका अरोराचा कथित बॉयफ्रेंड हर्ष मेहता पार्टीत उपस्थित होता. मलायका जेव्हा कार्यक्रमस्थळावरून बाहेर पडली तेव्हा तो दारामागे लपलेला दिसला. थोड्याच वेळात, तो रेस्टॉरंटमधून बाहेर पडून त्याच्या कारमधून निघून गेला. मलायकाने या खास कार्यक्रमासाठी पांढरा बॉडीकॉन शॉर्ट ड्रेस घातला होता. या लूकमध्ये ती ग्लॅमरस दिसत होती.

हर्ष मेहतासोबत डेटिंगच्या अफवा

गेल्या काही काळापासून, मलायका अरोरा आणि उद्योगपती हर्ष मेहता यांच्यात वाढत्या जवळीकतेच्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. रोममधील दोघांचा एक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर ही चर्चा अधिकच वाढली. नेटिझन्स आणि चाहत्यांनी असा दावा केला की हे कपल एकत्र व्हॅलेंटाईन डे साजरा करत होते. विशेष म्हणजे, हर्ष मेहता आणि मलायका यांच्यात वयाचे मोठे अंतर आहे. मलायका ५२ वर्षांची आहे, तर हर्ष ३३ वर्षांचा असल्याचे म्हटले जाते. दोघांमधील जवळजवळ १९ वर्षांचा फरक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT