malaika arora. saam tv
मनोरंजन बातम्या

Malaika Arora Warrant : आयटम गर्ल मलायका अरोराविरुद्ध कोर्टानं काढला वॉरंट; १२ वर्षे जुनं प्रकरण, बॉलिवूड अभिनेत्याशी कनेक्शन

Malaika Arora Warrant in Saif Ali Khan Case : अभिनेत्री मलायका अरोरा अडचणीत सापडली आहे. तिच्याविरोधात मुंबईतील कोर्टानं वॉरंट काढलं आहे.

Nandkumar Joshi

बॉलिवूडची आयटम गर्ल आणि फिटनेस क्वीन मलायका अरोराला मुंबईतील कोर्टानं मोठा झटका दिला आहे. तिच्याविरुद्ध पुन्हा जामिनपात्र वॉरंट काढला आहे. अभिनेता सैफ अली खानशी संबंधित हे प्रकरण आहे.

१२ वर्षांपूर्वीचं हे प्रकरण आहे. मुंबईच्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये दक्षिण आफ्रिकेतील उद्योजक आणि त्याच्या सासऱ्यावर हल्ला केल्याचा अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या दोन मित्रांवर आरोप करण्यात आला होता. मलायका देखील त्यावेळी सैफसोबत होती. मात्र, साक्षीदार म्हणून ती कोर्टात हजर झाली नव्हती.

या प्रकरणात मुंबई कोर्टात साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात येत आहे. कोर्टाकडून सर्वप्रथम १५ फेब्रुवारीला मलायका अरोरा हिच्याविरोधात जामिनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. मात्र, ती कोर्टात हजर झाली नाही. त्यामुळं सोमवारी पुन्हा कोर्टानं तिच्याविरुद्ध जामिनपात्र वॉरंट काढला. या प्रकरणावर पुढील सुनावणी २९ एप्रिलला होणार आहे.

१२ वर्षांपूर्वीच्या घटनेत मलायकाचं नाव

ही घटना २२ फेब्रुवारी २०१२ रोजी घडली होती. सैफ अली खान, करीना कपूर, करिश्मा कपूर, मलायका अरोरा, अमृता अरोरा आणि अन्य मित्र देखील त्यावेळी उपस्थित होते. हे सर्व जण मुंबईतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये डिनरसाठी गेले होते. पोलिसांच्या माहितीनुसार, अभिनेता आणि त्याच्यासोबतचे सर्व मित्र मोठमोठ्यानं गप्पा मारत असताना, शर्मा यांनी विरोध केला होता. त्यावेळी सैफ अली खाननं धमकी देत नाकावर ठोसा मारला होता. त्यामुळे फ्रॅक्चर झाला होता. त्याला आणि सासऱ्याला मारहाण केल्याचा आरोप सैफ आणि त्याच्या मित्रांवर करण्यात आला होता.

सैफनेही केले होते आरोप

या प्रकरणात सैफनेही संबंधितांवर आरोप केले होते. महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यामुळं वाद झाला होता, असा आरोप सैफनं केला होता. पोलिसांनी या प्रकरणात २१ मार्च २०१२ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. त्याअंतर्गत सैफ आणि त्याच्यासोबतच्या मित्रांना आरोपी करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जागावाटपावरून महायुतीत तणाव?महापालिकेसाठी मित्रपक्षांचं गणित काय?

तुळजापुरात दोन गटात तुफान राडा; भाजप आणि मविआमधील नेत्यामध्ये हाणामारी |Video Viral

Bhakri Tips: नाचणीची भाकरी लाटताना कटा फुटतात? या सोप्या टीप्सने होईल अगदी गोल भाकरी

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बंद? नवीन कायद्यामुळे नियमांमध्ये बदल?

Akshaye Khanna Dance: अक्षय खन्नानं २० वर्षांपूर्वीच्या चित्रपटातही केली होती 'धुरंधर'मधील FA9LA ची डान्स स्टेप, व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT