Malika-Arjun Diwali Party At Sonam Kapoor Saam Tv
मनोरंजन बातम्या

Malika-Arjun: मलायका-अर्जुनचे ते फोटो आणि व्हिडिओ झाले व्हायरल, मग काय नेटकऱ्यांनी...

सोनम कपूरच्या दिवाळी पार्टीमध्ये मलायका आणि अर्जुनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Celebrity Diwali Celebration: मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील स्टार कपल आहे. त्यांची केमिस्ट्री चाहते नेहमीच पसंत करत असतात. मलायका आणि अर्जुन अनेकदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर, सोनम कपूरच्या दिवाळी पार्टीत एकत्र स्पॉट झाले होते, त्यानंतर त्या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

दिवाळीपूर्वी बॉलिवूड स्टार्सच्या घरी जल्लोषात दिवाळी पार्टी होत होत्या. शिल्पा शेट्टी, एकता कपूर, मनीष मल्होत्रा, क्रिती सेनॉन, रमेश तौरानी, ​​आनंद पंडित आणि भूमी पेडणेकर यांच्यासह अनेक स्टार्सनी त्यांच्या घरी दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्ट्यांना बॉलिवूड कलाकारांनी आवर्जून हजेरी लावली होती.

सोनम कपूरनेही दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत मलायका आणि अर्जुनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनी एकमेकांचा हात धरून पार्टीत प्रवेश केला. (Diwali)

यावेळी मलायका आणि अर्जुन यांचे आऊटफिट कमाल होते. अर्जुन कपूर नेहमीप्रमाणे काळ्या रंगाचा कुर्ता आणि काळ्या रंगाचा पायजमा घातला होता. ज्यामध्ये तो हँडसम दिसत होता. त्याच्या हातात घड्याळ होते. तर मलायका ग्रीन कलरच्या आउटफिटमध्ये दिसली. मलायकाचा ड्रेस इंडो-वेस्टर्न होता. अभिनेत्रीने डीप नेक ब्लाउजसह हिरव्या रंगाचा स्लिट स्कर्ट घातला होता. त्यावर तिने एक श्रगही घेतला होता. दोघांना एकत्र पाहून सोशल मीडियावर यूजर्स या जोडप्याचे भरपूर कौतुक करत आहेत. (Bollywood)

23 ऑक्टोबरला मलायका अरोराने तिचा 49 वा वाढदिवस साजरा केला. यावेळी अर्जुनने आपल्या मलायकाला खूप रोमँटिक पद्धतीने शुभेच्छा दिल्या. अर्जुनने त्याच्या इंस्टाग्रामवरून एक पोस्ट शेअर केली होती. मिरर सेल्फीमधील दोघांचा फोटो अर्जुनने पोस्ट केला होता. अर्जुन कपूरनेही एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. पोस्ट शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'द यिन टू माई यांग, हॅपी बर्थडे बेबी, तू जशी आहेस तशीच राहा, आनंदी राहा, माझीच राहा.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections:भाजपला रोखण्यासाठी काका-पुतण्या एकत्र? ठाकरेंपाठोपाठ दोन्ही राष्ट्रवादीचीही युती?

KDMC Election: भाजपा–शिवसेना शिंदे गटकाडून युतीचे संकेत; मात्र जागा वाटपाचा तिढा अजूनही गुलदस्त्यात

Kalyan Politics: फोडाफोडीवरून महायुतीत पुन्हा वाद; शिवसेनेनं नगरसेवक पळवल्यानंतर भाजप आक्रमक

Maharashtra Elections: बायको, मुलगा-मुलगी,भाऊ-बहिणींनाच हवीय उमेदवारी; नेत्यांना फक्त आपल्याच घरात हवं तिकीट

कराडची जामीनासाठी न्यायालयात धाव, सुटकेनंतर समर्थक काढणार हत्तीवरून मिरवणूक?

SCROLL FOR NEXT