Malaika Arora  Saam TV
मनोरंजन बातम्या

Malaika Arora : मलायकाची ती पोस्ट अर्जुनसाठीच? ब्रेकअपच्या चर्चेनंतर मलायका म्हणते, लक्षात ठेवा...

Malaika Arora Post For Arjun Kapoor : मलायकाच्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या पोस्टमध्ये लिहिलेल्या काही गोष्टींचा संबंध नेटकऱ्यांनी अर्जुनच्या नात्याशी लावला आहे.

Mohini Sonar

सध्या मलायाका आणि अर्जुन कपूर यांच्या ब्रेकची चांगलीच चर्चा सुरु आहे. 2018 मध्ये मलायाका अरोरा आणि अर्जुन कपूर रिलेशनमध्ये आले होते. त्यांनतर अनेक दिवस ते एकमेकांसोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचीही चर्चा होती. बऱ्याच ठिकाणी हे दोघं सोबत असायचे. मात्र आता त्यांच्या ब्रेकअपची चर्चा जोर धरु लागली आहे. या सगळ्यात मलायकाच्या एका पोस्टमुळे नेटकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. तिच्या पोस्टमध्ये लिहिलेल्या काही गोष्टींचा संबंध नेटकऱ्यांनी अर्जुनच्या नात्याशी लावला आहे. दरम्यान, मलायकानं नेमकी काय पोस्ट केली आहे, जाणून घेऊया.

मलायकाने पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय?

मलायकाने लिहिलं आहे, की लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही गप्प असता, त्यावेळी जर कुणी तुमचा मागोवा घेत असेल तर तो व्यक्ती तुमचा आहे. असं तिनं पोस्ट करत म्हटलं आहे. त्यामुळे तिची ही पोस्ट अर्जुनसाठी आहे का? अशी चर्चा सुरु झाली आहे. दुसरीकडे तिनं एक मोटिव्हेश्नल पोस्टही शेअर केली आहे.

अर्जुनच्या वाढदिवशी मलायकाची गैरहजेरी

काही दिवसांपुर्वी अर्जुन कपूरचा वाढदिवस झाला. त्यादिवशी सर्वांना वाटत होते, की मलायका अर्जुन कपूरच्या वाढदिवशी येईल, मात्र मलायका तिथे आली नाही आणि त्यामुळे त्यांच्या ब्रेक अपच्या चर्चांनी जोर धरला. त्याच्या वाढदिवसाला त्याचे मित्र, मैत्रिणी, परिवार असे सगळे होते, फक्त मलायका नसल्यामुळे चर्चा सुरु झाली होती.

मलायकाच्या मिस्ट्री मॅनसोबत फोटो

मलायका काही दिवसांपुर्वी व्हॅकेशनसाठी गेली होती. तिथं तिनं एका व्यक्तिसोबत फोटो पोस्ट केला होता. त्यामुळे तो मिस्ट्री मॅन नेमका कोण अशी चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली. आणि त्या दोघांचं अफेअर असल्याचीही चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, याबाबत आम्ही कोणतीही पुष्टी करत नाही.

दरम्यान 2018 मध्ये सुरु झालेलं मलायाका आणि अर्जुन कपूर यांचं नातं आता संपुष्टात आल्याची चर्चा आहे. मात्र काही दिवसांपुर्वी त्यांच्या लग्नाचीही चर्चा होती. बऱ्याचवेळा हे दोघं एकत्र असायचे. त्या दोघांना अनेकांनी ट्रोलही केलं होतं. मात्र आता त्यांच्या ब्रेकमुळे मलायकाच्या आयुष्यात नेमकं चाललंय काय? असा सवाल उपस्थित होतो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गुंड गजा मारणेला पुण्यात बंदी, जामीन मिळाला, पण... VIDEO

आधारकार्ड आता जन्मतारखेचा पुरावा नाही; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय|VIDEO

Maharashtra Live News Update: राष्ट्रवादीने भाजपशी केलेली युती ही पॉलिटिकल ऍडजेस्टमेंट

BJP MLA Threat: भाजप आमदाराला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

Saturday Horoscope: आज महत्वाची कामे करताना सावधान, ५ राशींसाठी आनंदाचा दिवस, वाचा शनिवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT