Ek Daav Bhutach Song Out Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ek Daav Bhutach Song Out : सिद्धार्थ जाधव म्हणतोय 'देखणं पाखरु लाजलं'...सोनू निगमच्या सुरांची मिळाली साथ

Ek Daav Bhutacha First Song Out: 'एक डाव भुताचा' चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. सिद्धार्थचा हटके अंदाज या गाण्यात पाहायला मिळतोय.

Manasvi Choudhary

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार सिद्धार्थ जाधव आणि मकरंद अनासपुरे यांचा 'एक डाव भुताचा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचं पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाविषयीची उत्सुकता लागली आहे. नुकतंच चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज झालं आहे. सिद्धार्थचा हटके अंदाज या गाण्यात पाहायला मिळतोय.

सध्या सोशल मीडियावर रिलीज झालेल्या या गाण्याची चर्चा आहे. एक डाव भुताचा चित्रपटातील पहिलं गाणं देखणं पाखरू हे रिलीज झालं आहे. सिद्धार्थ आणि मयूरी यांच्या केमेस्ट्रीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. गावरान स्टाईलमध्ये निसर्गाच्या सानिध्यात या गाण्याचं शूट करण्यात आलं आहे. हे सुप्रसिद्ध गाणं सोनू निगम यांनी गायले आहे.

चित्रपटाची कथा

स्मशानात जन्म झाल्यानं सतत भूत दिसणाऱ्या तरुणाची कथा "एक डाव भुताचा" या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या तरुणाची भूमिका अभिनेता सिद्धार्थ जाधव साकारतोय, तर मकरंद अनासपूरे भूताच्या भूमिकेत आहेत. माणूस आणि भुताच्या नात्याची रंगतदार गोष्टीला प्रेमकहाणीचा तडकाही आहे.

कधी होणार चित्रपट रिलीज

माणूस आणि भुताच्या नात्याची गोष्ट सांगणारा हा विनोदी चित्रपट आहे. चित्रपटाचं टिझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांचे लक्ष चित्रपटांकडे लागले आहे.चित्रपटात सिद्धार्थ जाधव, मकरंद अनासपुरेसह अक्षय कुलकर्णी, हर्षद नायबळ, मयूरी देशमुख, अश्विनी कुलकर्णी, नंदिनी वेद्य, हे देखील मुख्य भूमिकेत आहेत. 'एक डाव भुताचा' हा चित्रपट ४ ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT