De Dhakka 2 'poster', Latest Marathi Movie, De Dhakka 2 Movie  Saam Tv
मनोरंजन बातम्या

De Dhakka 2 : थांबायचं नाय, गड्या घाबरायचं नाय! दे धक्का २ ची सुसाट एन्ट्री

दे धक्का २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येणार आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील धम्माल कॉमेडी(comedy) चित्रपट (movie), ज्याला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं तो म्हणजे 'दे धक्का'. या चित्रपटामधील मकरंद अनासपुरे , सिद्धार्थ जाधव , शिवाजी साटम यांच्या धम्माल विनोदामुळे प्रचंड मोठा चाहता वर्ग या चित्रपटाला लाभला होता. या चित्रपटातील गाणी कोणालाही ठेका धरून नाचायला भाग पडणारी आहेत. यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाचा दुसरा भाग यावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. (Latest Marathi Movie)

महेश मांजरेकरांनी, दे धक्का २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला चित्रपटगृहात येणार आहे, असे त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट करून शेअर केले आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी दिग्दर्शन केले आहे. (De Dhakka 2 Movie News Updates)

महेश मांजरेकरांनी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवर एक मोशन पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये या चित्रपटातील पात्रांची ओळख करून दिली आहे. तसेच या पोस्टर बॅकग्राऊंडया चित्रपटाचे गाणे वाजत आहे. 'थांबायचं नाय, गड्या थांबायचं नाय, घाबरायचं नाय, गड्या घाबरायचं नाय १ २ ३ ४ - "दे धक्का २" येतोय ५ ऑगस्ट २०२२ ला...' असे महेश मांजरेकरांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

या पोस्टवर चाहत्यांसोबत अनेक कलाकारांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता अक्षय वाघमारेने लिहिले की, 'क्या बात है सर आॅल द बेस्ट' तसेच एका चाहत्याने लिहिले की, 'हा चित्रपट पाहण्यासाठी मी खूप उत्साही आहे'. अजून एकाने लिहिले की, 'ओ माय गॉड अखेरीस हा चित्रपट येत आहे. मी या चित्रपटाची खूप वाट पाहिली आहे'.

हा चित्रपट विनोदाने भरलेला असून या चित्रपटाची निर्मिती मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर आणि स्कायलाइन एंटरटेमेंटने केली आहे. त्याचप्रमाणे चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम, गौरी इंगळे, मेधा मांजरेकर आणि सक्षम कुलकर्णी असे विनोदी कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल, स्व. हेमंत करकरे यांच्या आठवणी ताज्या

"तू xxx@# आहेस... तू आम्हाला मानत नाही का..?" शेतावरून वाद, तरूणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

New Bride Tips: नव्या नवरीने घरसंसार सांभाळताना टाइम मॅनेजमेंट कसं करावं?

Famous Actor Arrested : प्रसिद्ध अभिनेत्याला अटक; कंपनीला घातला ५ कोटींचा गंडा, ७ वर्षांपासून होता गायब

Jowar Flour Recipe : ज्वारीच्या पिठाचा हा पदार्थ कधी खाल्लाय का?

SCROLL FOR NEXT