Mahesh Manjrekar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Marathi Actor: भगवे वस्त्र, रुद्राक्ष माळ आणि कपाळावर भस्म; 'या' मराठी अभिनेत्याने का साकारला साधू अवतार?

Mahesh Manjrekar: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुमुखी अभिनेता, दिग्दर्शक पुन्हा एकदा एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेत झळकणार आहेत. या अभिनेत्याने साधूचा अवतार साकारुन प्रेक्षकांना थक्क केलं आहे.

Shruti Vilas Kadam

Mahesh Manjrekar: मराठी चित्रपटसृष्टीतील बहुमुखी अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक महेश मांजरेकर पुन्हा एकदा एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेत झळकणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचा ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चा टिझर नुकताच प्रदर्शित झाला असून, काही दिवसांतच तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या टिझर आणि विशेषतः ‘दुर्गे दुर्गट भारी’ या गाण्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

या गाण्यात महेश मांजरेकर पहिल्यांदाच साधूच्या वेषात दिसत असून, त्यांचा हा लूक प्रेक्षकांसाठी एक मोठं आश्चर्य ठरला आहे. भगव्या वस्त्रांमध्ये, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा, हातात शंख, विस्कटलेले केस आणि लांब दाढी असा त्यांचा देखणा पण गूढ लूक पाहताच प्रेक्षक थक्क झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील तीव्र भाव आणि डोळ्यांतील करारी नजर यामुळे या व्यक्तिरेखेत एक वेगळी ताकद आणि आध्यात्मिकता जाणवते.

महेश मांजरेकर यांनी आपल्या या नवीन लूकविषयी सांगितले, “आजवर मी अनेक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत, पण साधूच्या व्यक्तिरेखेत प्रथमच दिसणार आहे. हा लूक माझ्या नेहमीच्या व्यक्तिरेखांपेक्षा पूर्णतः भिन्न आहे. या भूमिकेत एक गूढता, सामर्थ्य आणि अध्यात्मिकता आहे जी मला खूप भावली. माझ्यासाठी ही एक नवी अभिनययात्रा ठरणार आहे.”

झी स्टुडिओज प्रस्तुत, द ग्रेट मराठा एंटरटेनमेंट, सत्य सई फिल्म्स आणि क्रिझोल्ह निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले आहे. निर्माते राहुल पुराणिक आणि राहुल सुगंध असून, या चित्रपटात सिद्धार्थ बोडके, विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने आणि नित्यश्री यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा ऐतिहासिक आणि भावनिक चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. महेश मांजरेकर यांच्या या साधूच्या भूमिकेमुळे आणि प्रभावी गाण्यामुळे ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांसाठी एक खास सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : दावोस दौऱ्यामुळे 30 लाख कोटींची गुंतवणूक - CM फडणवीस

बीडमध्ये गुंडाराज सुरूच! किरकोळ कारणावरून तरुणाला काळंनिळं होईपर्यंत मारलं

वर्सोवा कोळी फूड फेस्टिव्हल २०२६ला उद्यापासून सुरुवात, कोळी खाद्यसंस्कृतीचा भव्य उत्सव

White Dress: प्रजासत्ताक दिनी ट्राय करा 'हे' पांढऱ्या रंगाचे सुंदर आणि ट्रेंडी ड्रेस

Mayor Race : कल्याण-डोंबिवलीचा महापौर कोण? 3 नावांची चर्चा, मनसेची नगरसेविकाही शर्यतीत आघाडीवर

SCROLL FOR NEXT