Prajakta Mali Birthday Celebration At Karjat In MHJ Team  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Birthday Celebration: ‘प्राजक्तकुंज’वर हास्यजत्रेच्या टीमचा कल्ला, प्राजक्ता माळीच्या बर्थडेचं जंगी सेलिब्रेशन, मग चर्चा तर होणारच...

Prajakta Mali Birthday Celebration At Prajaktakunj Farmhouse: प्राजक्ताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कर्जतच्या ‘प्राजक्तकुंज’ फार्महाऊसवर ‘हास्यजत्रा’च्या टीमने जोरदार पार्टी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

Chetan Bodke

Prajakta Mali Birthday Celebration At Karjat In MHJ Team

कायमच सोशल मीडियावर भन्नाट फोटोंमुळे चर्चेत राहणारी प्राजक्ता माळी गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वाढदिवसामुळे चर्चेत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर तिच्या नव्या फार्म हाऊसचे काही फोटो व्हिडीओ शेअर केले होते. तेव्हापासून तिच्या फार्म हाऊसची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरू झाली. प्राजक्ताचा ८ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता. प्राजक्ताच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिच्या कर्जतच्या फार्महाऊसवर ‘हास्यजत्रा’च्या टीमने जोरदार पार्टी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या टीमसाठी तिच्या कर्जतच्या ‘प्राजक्तकुंज’ फार्महाऊसवर खास पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी ‘हास्यजत्रे’मधल्या कलाकारांनी पार्टीसाठी हजेरी लावली होती. नुकतंच फार्म हाऊसवरील धम्माल मस्ती करतानाचा व्हिडीओ अभिनेत्री वनिता खरातने तिच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केले आहे. सध्या अभिनेत्रीचा हा व्हिडीओ बराच चर्चेत आला आहे.

वनिता खरातने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शन दिले की, “प्राजक्ताने फार्म हाऊस घेतलं आणि आम्ही तिथे पार्टी करायला गेलो नाही, ऐसा हो नहीं सकता..., प्राजक्ता माळीच्या फार्म हाऊसवरची धमाल मस्ती..., नवीन ब्लॉग आमच्या युट्यूब चॅनलवर आलेला आहे. लगेच बघा आणि कॉमेंट मध्ये कळवा कसा झाला आहे.” अशी कॅप्शन देत अभिनेत्रीने व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केलेली आहे.

वनिताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बहारदार वातावरण, बंगल्याच्या बाजुला असलेले वातावरण, स्विमिंग पुलमध्ये केलेली धमाल मस्ती आपल्याला व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. यावेळी प्राजक्ताच्या फार्महाऊसमध्ये अरुण कदम, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, सचिन मोटे, ओंकार राऊत हे हास्यजत्रेतले कलाकार व्हिडीओमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Amit Shah : 'पहलगाम हल्ला करणारे तिन्ही दहशतवादी मारले', शाहांकडून संसदेत माहिती | VIDEO

Dream Psychology: स्वप्नात वारंवार अपघात पाहण्याचे संकेत काय?

Mrunal Thakur: तुझं सौंदर्य पाहून चंद्रही लाजेल...

SCROLL FOR NEXT