Shivali Parab Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shivali Parab: शिवाली हे खरं आहे का?, अभिनेत्रीचा 'त्या' व्यक्तीसोबतचा फोटो पाहून चाहत्यांना पडलाय प्रश्न

Shivali Parab And Nimish Kulkarni: शिवालीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये शिवालीसोबत दिसणारी ती व्यक्ती कोण आहे?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

Priya More

Shivali Parab Instagram Post:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाद्वारे घराघरामध्ये पोहचलेली अभिनेत्री शिवाली परब सध्या चर्चेत आली आहे. शिवाली परबचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणारी शिवाली परब (Shivali Parab) नेहमी नवनवीन पोस्ट शेअर करत असते. या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच शिवालीने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमुळे ती चर्चेत आली आहे. या फोटोमध्ये शिवालीसोबत दिसणारी ती व्यक्ती कोण आहे?, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे.

शिवाली परबने नुकताच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये शिवालीसोबत एक तरुण दिसत आहे. या फोटोमध्ये शिवाली परब अभिनेता निमिष कुलकर्णीसोबत दिसत आहे. निमिष देखील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमात काम करतो. शिवालीचे निमिषसोबतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर तिच्या चाहत्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. शिवाली आणि निमिष एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होऊ लागल्या आहेत.

शिवालीने निमिषसोबतचे फोटो पोस्ट करत त्याला आकर्षक कॅप्शन दिले आहे. तिने कॅप्शनमध्ये 'निमिष की निषिम, सब कल की बाते', असे लिहिले आहे. शिवालीने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवाली परबच्या या फोटोंवर तिच्या चाहत्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. 'शिवाली हे खरयं का?', 'बॉयफ्रेंड की नवरा?', 'लग्न कधी करताय?' असे अनेक प्रश्न विचारले आहेत. शिवालीने निमिषसोबतच्या फोटोला हार्ट इमोजी देखील पोस्ट केली आहे. त्यामुळे दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे.

या फोटोमध्ये दिसत आहे की, शिवाली परबने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर निमिषने देखील सारख्याच रंगाचा टीशर्ट आणि डेनिमचे जॅकेट परिधान केले आहे. दोघांनीही एकाच रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवालीच्या या पोस्टला तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या फोटोला आतापर्यंत २१ हजारांपेक्षा जास्त लाइक्स देखील मिळाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: रात्री झोपण्यापूर्वी किचनमध्ये या ४ चुका करू नका; नकारात्मक उर्जा करेल घरात प्रवेश

Skin Care : अंगावर परफ्यूम लावताय? मग थांबा जाणून घ्या 'या' महत्त्वाच्या गोष्टी

Chhagan Bhujabal: मंत्री छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, पुढील उपचारासाठी मुंबईला हलवलं

Maharashtra Live News Update: पुण्यात भटक्या कुत्र्यांचा चिमुरड्यावर हल्ला, सीसीटीव्हीमध्ये घटना कैद

Ladki Bahin Yojana update: ...तोपर्यंत 'लाडकी'च्या खात्यात ₹१५०० येणार नाहीत, मंत्रालयातून आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT