Shivali Parab Song Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shivali Parab :लचकत -ठुमकत नदीकिनारी आली 'मासोळी ठुमकेवाली'; शिवाली परबचं नवीन गाणं लॉन्च

Shivali Parab Song: शिवाली परबचे 'मासोळी ठुमकेवाली' हे गाणे लाँच झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtrachi Hasyajatra Fame Shivali Parab New Song:

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री शिवाली परब नेहमीच आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत असते. ती नेहमीच कॉमेडीचा अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना हसवत असते. शिवाली आता एका नवीन रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शिवाली परबचे 'मासोळी ठुमकेवाली' हे गाणे लाँच झाले आहे.

शिवाली परब आता कॉमेडी नव्हे तर एका वेगळ्याच रुपात चाहत्यांच्या भेटीला आली आहे. सप्तसूर म्युझिकतर्फे तिचा 'मासोळी ठुमकेवाली' हा नवा म्युझिक व्हिडिओ लाँच करण्यात आला आहे. या गाण्यातून एक नवीकोरी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन गाण्यात शिवाली परब आणि अभिजित अमकर यांची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. गाण्याच्या नावावरुन प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. सर्वांना ताल धरायला लावणारं हे गाणं सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे.

मराठी गाण्यांमध्ये कोळीगींताना एक वेगळंच महत्त्व आहे. लोक नेहमीच कोळीगीत गुणगुणताना दिसतात. हळद असो, लग्न असो किंवा कार्यक्रम असो कोळीगीत हे वाजवलेच जाते. असंच एक 'मासोळी ठुमकेवाली' कोळीगीत प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. गाण्यातील शिवालीचा डान्स हा सर्वांनाच आवडेल यात काही शंका नाही. डान्स, ताल आणि रोमान्स अशा सर्व गोष्टी या गाण्यात पाहायला मिळणार आहे.

हर्ष करण आदित्य (त्रिनिती ब्रोस) यांनी गाणे लिहले असून हर्षवर्धन वावरे, करण वावरे, आदित्य पाटेकर यांनी संगीतबद्ध केलं आहे. कस्तुरी वावरे, आदित्य पाटेकर यांनी हे गाणं गायलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT