Onkar Bhojane  Instagram/ @onkar_raut
मनोरंजन बातम्या

Maharashtrachi Hasyajatra: महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील 'या' कलाकाराने साकाराली स्त्री पात्राची भूमिका, पोस्ट चर्चेत

ओंकार राऊत येत्या भागात स्त्री भूमिका साकारत आहे. त्या विषयी त्याने काही खास फोटो शेअर करत त्या फोटोंनाही हटके कॅप्शन दिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Onkar Raut: प्रेक्षकांना दुःखाच्या काळात निखळ मनोरंजन करणारा कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. मनोरंजनासाठी प्रेक्षक हा कार्यक्रम आवर्जुन पाहतात. या कार्यक्रमात प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारे कलाकार म्हणजे नम्रता संभेराव, ओंकार राऊत, समोर चौघुले, विशाखा सुभेदार, निखिल बने, शिवाली परब ई. विनोदवीर प्रेक्षकांचे आपला हात न आखडता घेत मनोरंजन करत आहे.

या कार्यक्रमाची मुख्य ओळख म्हणजे पोट धरून हसवणे आहे. सोशल मीडियावर या कार्यक्रमातील कलाकारांच्या पोस्ट बऱ्याच चर्चेत असतात. हे सर्वच कलाकार सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. आता पुन्हा एकदा या कार्यक्रमातील एका विनोदविराची पोस्ट चर्चेत आली आहे. तो विनोदवीर म्हणजे ओंकार राऊत.

त्याने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पोस्टवरून चांगलीच चर्चा रंगली आहे. नुकतेच त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाविषयी एक पोस्ट केली आहे. बऱ्याचदा पुरुष कलाकार स्त्री भूमिका साकारतात. तसेच या कार्यक्रमातही पुरुष कलाकार स्त्री भूमिका साकारतात.

ओंकार राऊत येत्या भागात स्त्री भूमिका साकारत आहे. त्या विषयी त्याने काही खास फोटो शेअर करत त्या फोटोंनाही हटके कॅप्शन दिले आहे.

त्या फोटोमध्ये त्याने लिहिले की, 'स्त्री पात्र साकरायची इच्छा महाराष्ट्राच्या हास्यजत्रेने पूर्ण केले. त्यासाठी त्याने सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांचे मनापासून आभार मानले. स्त्री पात्र सादर करायचा एक सालस प्रयत्न! हो! स्त्रियांना तयार व्हायला वेळ लागतो आणि तो वेळ त्यांनी घ्यावा!', असे त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

ओंकारच्या या पोस्टवर अनेक कलाकार कमेंट करीत आहेत. अभिनेत्री ऋतुजा बागवेने या पोस्टवर कमेंट केली की, 'तू हिला पटवं, एकदम फटका' असे ऋतुजा बागवे म्हणते. तर अभिनेता शुभांकर तावडे कमेंट करत म्हणतो, ‘मला तू हवी आहेस’, त्यावर ओंकारनेही हसण्याचे आणि हार्ट इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur : नागपूर बोगस शिक्षक भरती प्रकरणात मोठी कारवाई, सिद्धेश्वर काळुसे आणि रोहिणी कुंभार यांना अटक

Pink E Rikshaw: खुशखबर! आता एकही रुपया न भरता महिलांना मिळणार पिंक रिक्षा, अर्ज करण्याची शेवटची तारीख काय?

Smartphone Features: तुमच्या स्मार्टफोनमध्ये लपलेली 'ही' गुप्त फीचर्स माहिती आहेत का? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: जायकवाडी धरण ९१ टक्के भरले, आज धरणाचे दरवाजे १८ फुटांनी उघडणार

Prajakta Mali: खुशखबर! प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' आता मोफत पाहायला मिळणार, कधी अन् कुठे? वाचा अपडेट

SCROLL FOR NEXT