Shivpratap Garudjhep: शिवप्रतापांची ओटीटीवर गरुडझेप, येणार 'या' ओटीटी प्लॅटफॉर्मवर

'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.
Shivpratap Garudjhep OTT Release:
Shivpratap Garudjhep OTT Release:Saam Tv

Shivpratap Garudjhep OTT Release: चित्रपट आणि मालिकेचा प्रेक्षक वर्ग ओटीटीकडे वळत आहे. अनेकजण ओटीटीवर चित्रपटाचा आनंद घेणे पसंत करतात. त्यामुळे प्रेक्षक ओटीटीवर चित्रपट किंवा वेबसीरीज कधी प्रदर्शित होणार याची वाट बघत असतात. मराठी चित्रपट देखील ओटीटीवर सात्यत्याने येत असतात. त्यात आता एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे. 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहे.

Shivpratap Garudjhep OTT Release:
Bigg Boss 16: आम्ही चोर वाटतो का? संतापलेल्या सलमानकडून शालीन-अर्चनाची खरडपट्टी

'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटाला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये चांगली कमाई सुद्धा केली. चित्रपट प्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. ज्या ज्या चाहत्यांना हा चित्रपट बघता आला नाही ते सुद्धा या चित्रपटाचा आंनद आता घेऊ शकतात. 'शिवप्रताप गरुडझेप' या चित्रपटच आज वर्ल्ड वाईड ओटीटी प्रिमियर झाला आहे. 'टीएफएस प्ले' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'शिवप्रताप गरुडझेप' हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे. (OTT)

ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या 'शिवप्रताप गरुडझेप' विषयी डॉ अमोल कोल्हे यांनी आपले मत व्यक्त केला आहे, 'आमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे. मोठया पडद्यानंतर ओटीटीवर 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचा प्रिमियर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. प्रत्येक माध्यमाची स्वतःची ताकद आणि ओळख आहे. ओटीटीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा देदिप्यमान इतिहास जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहचेल हे आमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.' (Amol Kolhe)

'जगदंब क्रिएशन्स'ची निर्मिती असलेल्या 'शिवप्रताप गरुडझेप' चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक राजाराम केंढे यांनी केले आहे. चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे यांच्यासह यतीन कार्येकर, प्रतीक्षा लोणकर, हरक अमोल भारतीया, शैलेश दातार, हरीश दुधाडे, मनवा नाईक, पल्लवी वैद्य, अजय तपकिरे, रमेश रोकडे, अलका बडोला कौशल, आदी ईराणी, विश्वजीत फडते आदी कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. (Actor)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com