Shivali Parab Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Shivali Parab Movie: 'कल्याणची चुलबुली' शिवाली परबचा नवा चित्रपट येतोय, कधी होणार रिलीज?

Shivali Parab New Movie: अभिनेत्री शिवाली परबचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर शिवालीने याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे.

Manasvi Choudhary

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमातून लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शिवाली परब चर्चेत आली आहे. शिवालीने तिच्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती दिली आहे. अभिनेत्री शिवाली परबचा नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोशल मीडियावर शिवालीने याबाबतची माहिती चाहत्यांना दिली आहे.

अभिनेत्री शिवालीने इन्स्टाग्राम प्लॅटफॉमवर नुकतंच एक पोस्ट शेअर केली आहे.पोस्ट शेअर करत शिवालीने,'३० ऑगस्टपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात...' असं कॅप्शन दिलं आहे. शिवालीच्या नवीन चित्रपटाचं नाव 'नेता गीता' असं आहे. या चित्रपटात शिवालीसह अभिनेत्री शिवानी बावकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 'नेता गीता' हा चित्रपट येत्या २३ ऑगस्टपासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

शिवालीच्या पोस्टवर चाहत्यांनी प्रतिक्रिया देत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटात शिवालीची भूमिका काय असेल? चित्रपटाची कथा काय आहे? याबाबतची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मागील अनेक वर्षापासून शिवाली परब 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे शिवाली परब घराघरात पोहोचली. या कार्यक्रमामुळे शिवालीला 'कल्याणची चुलबुली' या नावाने ओळखलं जातं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malad Tourism: गुलाबी थंडी अगदी जवळच फिरायला जायचंय? मग मालाडमधील या जागा ठरतील बेस्ट ऑप्शन

Secret Santa Gifts : लाडक्या मित्रांसाठी 'सिक्रेट सांता' गिफ्ट्स, 500 रुपयांच्या आता युनिक भेटवस्तू

Pune News: पुण्यातील आदिवासी पाड्यात पहिल्यांदाच प्रकाश, ४० वर्षानंतर वीज पोहचली

आमदार सुनील शेळकेंच्या कुटुंबीयांवर जमिनीत उत्खननाचा आरोप, काकडेंकडून कारवाईची मागणी

Maharashtra Live News Update: पुणे महानगरपालिकेसाठी मनसेची उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक

SCROLL FOR NEXT