Nimish Kulkarni Saam Tv
मनोरंजन बातम्या

Nimish Kulkarni: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चा लाडका अभिनेता आता रुपेरी पडद्यावर; 'द्विधा' चित्रपटात साकारणार खास भूमिका

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मुळे लोकप्रिय झालेला निमिष कुलकर्णी 'द्विधा' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. २१ ऑगस्टला प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात तो आदित्यची भावनिक भूमिका साकारणार आहे.

Shruti Vilas Kadam

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला अभिनेता निमिष कुलकर्णी आता मराठी चित्रपटसृष्टीत नवा टप्पा गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. आपल्या सहज अभिनयशैली आणि अचूक विनोदी टायमिंगमुळे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारा निमिष आगामी 'द्विधा' या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दमदार पदार्पण करत आहे. हा चित्रपट २१ ऑगस्ट रोजी राज्यभर प्रदर्शित होणार आहे.

'द्विधा' या चित्रपटात निमिष आदित्य उर्फ 'आदि' ही व्यक्तिरेखा साकारत आहे. मनाने प्रेमळ, समजूतदार आणि विश्वासू असलेला आदि हा कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारा शांत आधार आहे. श्रावणीचा आत्येभाऊ असलेल्या आदिचं तिच्यासोबतचं नातं बालपणापासून जिव्हाळ्याचं आहे. कमी बोलणारा पण समोरच्याच्या भावना अचूक ओळखणारा आणि प्रत्येक कठीण प्रसंगी कुटुंबासोबत खंबीरपणे उभा राहणारा आदि चित्रपटातील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.

या भूमिकेबद्दल बोलताना निमिष कुलकर्णी म्हणाला, "'द्विधा' हा फक्त बाप-लेकीच्या नात्याचा चित्रपट नाही, तर प्रत्येक नात्यात दडलेल्या भावनांचा प्रवास आहे. या भूमिकेमुळे मला अनेक भावनिक पैलू अनुभवता आले. दिग्दर्शक निलेश नाईक यांची संवेदनशील मांडणी आणि अनुभवी कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव खूप समृद्ध करणारा ठरला. प्रेक्षकांनी आजवर माझ्यावर भरभरून प्रेम केलं आहे. 'द्विधा'मधील माझी भूमिका देखील त्यांना नक्की आवडेल, अशी मला आशा आहे."

'द्विधा' या चित्रपटात बाप-लेकीच्या नात्यातील भावनिक जिव्हाळा अत्यंत हळुवार आणि वास्तववादी पद्धतीने उलगडण्यात आला आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन निलेश भास्कर नाईक यांनी केले असून विदुला रमेश आजगावकर यांनी निर्मितीची धुरा सांभाळली आहे. चित्रपटात सतीश पुळेकर, मानसी कुलकर्णी, रेणुका दफ्तरदार, आस्ताद काळे, तन्वी कुलकर्णी, पुष्कर सराड, मनोज कोल्हटकर, भूषण कडू, प्रफुल्ल सावंत, हेमांगी वेळणकर आणि ओवी तानवडे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. २१ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

Happy Married Life Tips: नवरा-बायकोमधील सततची भांडणे मिटवण्यासाठी ‘या’ ५ सोप्या गोष्टींची मदत घ्या; संसारात राहील गोडवा

SCROLL FOR NEXT