Maharashtrachi Hasya Jatra Fame Viraj Jagtap Saam TV
मनोरंजन बातम्या

Viraj Jagtap Viral Video : माझ्या सुनेने हे केलंच पाहिजे... हास्यजत्रा फेम विराज जगतापच्या आईने ठेवली ही अट

Maharashtrachi Hasya Jatra: विराज जगताप या मालिकेत आर्ट डायरेक्ट म्हणून काम करतो.

Pooja Dange

Maharashtrachi Hasya Jatra Fame Viraj Jagtap: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. कार्यक्रमाप्रमाणे त्यातील कलाकार देखील नेहमीच चर्चेत असतात. प्रेक्षकांना देखील या कलाकारांविषयी जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते.

या कार्यक्रमातील असाच एक कलाकार म्हणजे विराज जगताप. विराज जगताप या मालिकेत आर्ट डायरेक्ट म्हणून काम करतो. पण तो छोट्या-मोठ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो.

त्यामुळे तो संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला आहे. त्याच्या भूमिका आणि कॉमेडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. सध्या सर्वत्र विराजची चर्चा सुरु आहे. मज्जा या वाहिनीने विराजची मुलाखत घेतली आहे. (Latest Entertainment News)

बायकोसाठी माझी एक अट आहे.

विराजची ही मुलाखत फारच चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तो त्याच्या या क्षेत्रातील प्रवासाबद्दल सांगत आहे. त्याच्या आवडी-निवडींविषयी मोकळेपणाने बोलला आहे. मुलाखतीत त्याची आईही सहभागी झाली होती. त्यामुळे त्याच्या लग्नाची चर्चा होणे साहजिक होते. विराजच्या आईने त्यांना सून कशी हवी हे देखील सांगितले.

विराजच्या आई यावर उत्तर देत म्हणाल्या, 'सून छान हवी.. व्यवस्थित राहणारी, वागणारी, माणूस म्हणून चांगली हवी. घरात सांभाळणारी हवी. माझी एकच अट आहे. मी नवरात्रीचे उपवास करते, आमच्याकडे नऊ दिवस घट असतात. दोन वेळ आरती असते, सातव्या माळेच्या दिवशी फुलोरा असतो त्यामुळे मी जे आजपर्यंत करत आले ते तिनेही आवडीने करावं एवढीच माझी इच्छा आहे.' (Celebrity)

त्यावर विराज म्हणतो , 'आमची आई मुलगी पाहताना कोणत्याच अटी घालत नाही. तिचं एकच म्हणणं असतं की तिने नवरात्र आवडीने कराव्यात बाकी आपण सगळं समजून घेऊ.. अगदी नाहीच तिला जमलं तर तू शिकून घे.. आणि तू नवरात्र कर.. पण कर.. ही इतकीच माफक अपेक्षा आहे तिची.' (Maharashtrachi Hasya Jatra)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT