Vanita Kharat Saam Tv
मनोरंजन बातम्या

Vanita Kharat: फोन उचलताच बँक अकाऊंट रिकामं, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनीता खरातला हजारोंचा गंडा घातला; VIDEO चर्चेत

Vanita Kharat: वनिता खरातचं WhatsApp अकाउंट कुरिअरच्या नावाने हॅक करण्यात आलं. तिच्या कॉन्टॅक्ट्सना मेसेज करून पैशांची मागणी झाली. अभिनेत्रीने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना सावध केलं.

Shruti Vilas Kadam

Vanita Kharat: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री वनीता खरात सायबर फसवणुकीची शिकार झाली आहे. ‘तुमचं पार्सल येणार आहे, मात्र डिलिव्हरी बॉयला तुमचा पत्ता मिळत नाहीये’, असं सांगत सायबर भामट्यांनी वनीताला आपल्या जाळ्यात ओढलं. या प्रकरणात तिचे तब्बल 62 हजार रुपये गेल्याची माहिती समोर आली आहे. वनीताने स्वतः या फसवणुकीचा प्रकार सांगत चाहत्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.

वनिताने सांगितलं की, तिचं एक पार्सल येणार होतं. त्यावेळी एका व्यक्तीचा फोन आला. ‘ब्लू डार्ट कंपनीमधून बोलत आहे. तुमचं पार्सल येणार आहे; मात्र डिलिव्हरी बॉयला तुमचा पत्ता सापडत नाही,’ असं त्या व्यक्तीने सांगितलं. त्याने एका नंबरवर पत्ता पाठवण्यास सांगितलं. सुरुवातीला वनिताला संशय आला आणि तिने पत्ता आधीच कुरिअरकडे असल्याचं सांगितलं.

मात्र संबंधित व्यक्तीने दोन-तीन वेळा फोन केला. त्याने सांगितलेला नंबर वनिताने डायल केल्यानंतर काही सेकंदांत तिचं WhatsApp अकाउंट हॅक झालं. तिच्या फोनमधून WhatsApp लॉगआऊट झालं. एवढंच नाही तर तिचे कॉल्स दुसऱ्या नंबरवर फॉरवर्ड करण्यात आले आणि ती कोणाचा फोनही घेऊ शकत नव्हती.

यानंतर वनिताच्या WhatsApp अकाउंटवरून तिच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील अनेकांना मेसेज पाठवण्यात आले. ‘मी अडचणीत आहे, मला मदत करा,’ असं सांगत तब्बल ६२ हजार रुपयांपर्यंत पैशांची मागणी करण्यात आली. वनिताच्या काही मित्रांनी हे मेसेज खरे समजून पैसेही पाठवल्याचं तिने सांगितलं. या प्रकरणाची तक्रार सायबर पोलिसांकडे करण्यात आली असून पोलिस तपास करत आहेत.

या घटनेनंतर वनिताने चाहत्यांना सावध केलं. कुरिअर कंपनी किंवा कोणत्याही मोठ्या संस्थेच्या नावाने फोन आला तरी तातडीने कोणताही नंबर डायल करू नये. संशयास्पद कॉल आल्यास माहिती तपासून संबंधित नंबर ब्लॉक करावा, असं तिने सांगितलं. WhatsApp वरून पैसे मागणारा मेसेज आल्यास पैसे पाठवण्यापूर्वी संबंधित व्यक्तीशी थेट फोनवर संपर्क साधून खात्री करण्याचा सल्लाही तिने दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT