Maharashtra Shaheer Official Teaser
Maharashtra Shaheer Official Teaser You Tube
मनोरंजन बातम्या

Maharashtra Shaheer Teaser: मराठीचा स्वाभिमान जपणाऱ्या शाहीर साबळेंची जीवनगाथेचा टीझर प्रदर्शित

Chetan Bodke

Maharashtra Shaheer Official Teaser Out: केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. 2023 हे वर्ष महाराष्ट्र शाहीर यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यांच्या या खास वर्षानिमित्त नातू केदार शिंदे आपल्या आजोबांचे जीवन चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे.

चित्रपटात मुख्य भूमिकेत अंकुश चौधरी शाहीर साबळेंच्या भूमिकेत सिनेमात झळकणार आहे. चित्रपट येत्या २८ एप्रिलला प्रदर्षित होणार असून आज चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

नुकताच चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून या टीझरमध्ये सुरुवातीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, यांची झलक दिसते. सोबतच साने गुरुजी, लता मंगेशकर यांच्या एका झलकेमुळे टीझरला चारचाँद लागले. सोबतच या टीझरमध्ये शाहिर साबळे यांच्या वेगवेगळ्या गाण्याची झलक पाहायला मिळत आहे. चित्रपटाचा पहिला टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर त्याची चर्चा होत आहे.

महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या आठव्या स्मृतीदिनी केदार शिंदे दिग्दर्शित शाहिरांचा जीवनपट ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचा टीझर महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सोमवारी २० मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता जिओ वर्ल्ड ड्राइव्ह, वांद्रा पुर्व या सिनेमाचा टीझर प्रकाशित झाला.

यावेळी शाहिरांच्या पत्नी राधाबाई कृष्णराव साबळे, दिग्दर्शक केदार शिंदे, प्रमुख कलाकार अंकुश चौधरी, सना केदार शिंदे, निर्माते संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे, संगीतकार अजय-अतुल, आणि पटकथा-संवाद लेखिका प्रतिमा कुलकर्णी हे मान्यवर उपस्थित होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nigeria Bomb Blast: प्रॉपर्टीच्या वादातून प्रार्थनास्थळात बॉम्बस्फोट; ८ जणांचा मृत्यू, १६ जखमी

Mumbai Lok Sabha: मुंबईत आज पॉलिटिकल ब्लॉकबस्टर; शिवाजी पार्कवर PM मोदी अन् राज ठाकरे, तर बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तीप्रदर्शन

Rashi Bhavishya: आज 'या' राशींवर शनीदेवाची कृपा, पैशाची आवक वाढेल

Daily Horoscope: कष्टाला पर्याय नाही, 'या' ३ राशीच्या लोकांना मेहनतीचे फळ मिळणार; तुमच्या राशीत काय?

Maharashtra Election: लोकसभा निवडणुकांच्या अखेरच्या टप्प्यात अस्तित्वाचं 'राज'कारण

SCROLL FOR NEXT