Kedar Shinde Post Instagram @ankushpchaudhari
मनोरंजन बातम्या

Kedar Shinde Post: 'हा माझ्यासाठी सिनेमा नाही तर...', दिग्दर्शक केदार शिंदेंनी चित्रपटाविषयी व्यक्त केल्या भावना

Maharashtra Shaheer Movie Update: २८ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शाहीर बघायचा! ही चळवळ उभी करायची आहे.

Pooja Dange

Kedar Shinde Share Post And Express: दिग्दर्शक केदार शिंदे सध्या त्यांच्या आगामी चित्रपटामध्ये व्यस्त आहेत. त्यांच्या महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. केदार शिंदे यांनी त्यांचे आजोबा शाहीर साबळे यांच्या जन्म शताब्दी निमित्त या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ आली आहे. याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी त्यांच्या मनःस्थिती बोलून दाखवली आहे. सपशेल मीडियावर पोस्ट करत केदार शिंदे यांनी त्यांच्या या चित्रपटाविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

केदार शिंदे यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'गेले ४ वर्ष मी या सिनेमासाठी काम करतोय. याक्षणी माझी मनस्थिती काय असेल? हे सांगणं कठीण आहे. “महाराष्ट्र शाहीर” हा माझ्यासाठी सिनेमा नाही, एक जबाबदारी आहे. पुढच्या पिढीला शाहीर कळावेत यासाठी अट्टाहास!!

नाहीतर उद्या आपल्या पोरांना गोत्र विचारलं तर ते.. Netflix किंवा Amazon सांगायचे. यासाठी एक मदत हवी. प्रोमो पाठवीन ते तुमच्या लोकांना forward करा. Groups ना forward करा. २८ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शाहीर बघायचा! ही चळवळ उभी करायची आहे...'

केदार शिंदे यांनी त्यांच्या या पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षकांना 'महाराष्ट्र शाहीर' बघण्याची आणि त्यांना पुढच्या पिढीपर्यंत पोहचविण्याची विनंती केली आहे.

'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट २८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अंकुश चौधरी शाहीर साबळे यांची भूमिका साकारत आहे. तर केदार शिंदे यांची मुलगी सना शिंदे शाहिरांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे संगीत अजय-अतुल यांनी केले आहे.

या चित्रपटातील 'बहराला हा मधुमास' आणि 'गाऊ नको किसना' ही गाणी खूप गाजली आहेत. या चित्रपटाच्या टीझरने देखील प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : भाजप आमदाराच्या आश्रमशाळेत भीषण अपघात, पाण्याची टाकी कोसळून १४ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Emergency Landing : ५००० फूटावर विमानाचं इंजिन बिघडलं; बोईंग ड्रीमलाइनरचं इमर्जन्सी लँडिग, नेमकं काय घडलं?

Pet Dogs: पाळीव कुत्र्यांना ट्रेनिंग कसे द्यावे? जाणून घ्या

Maharashtra Politics: 'आता तुम्हाला अखेरची संधी' वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT