Sayaji Shinde: अभिनेते सयाजी शिंदे अभिनयासोबतच समाजिक कार्यातही सक्रिय आहेत. त्यांनी अनेक गावं दत्तक घेत समाज कार्याचा वसा घेतला. त्यांच्या या कार्याचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते अभिनेता सयाजी शिंदे यांचा ‘भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समर्पण पुरस्कार सोहळा २०२३’ सत्कार करण्यात आला आहे. यावेळी अभिनेते सयाजी शिंदे यांचा मानपत्र प्रदान करत गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत साहित्य अभ्यासक सदानंद मोरे हे आहेत. सोबतच यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सयाजी शिंदे यांचा पुणेरी पगडी घालून सन्मान करण्यात आला.
यावेळी सयाजी शिंदेंनी पुरस्कार मिळाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली. सयाजी शिंदे म्हणतात, “मला आयुष्यात कुठलेच कधी पुरस्कार घ्यायचे नाहीत. पण हा पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असल्यामुळे तो मी स्वीकारतोय याचा मला आनंद आहे. इरिगेशन डिपार्टमेंट मध्ये वॉचमनच काम करत असताना मी, विद्रोही कविता तोंडपाठ करून स्टेजवर सादर केल्या होत्या.” (Maharashtra Breaking News)
सोबतच ते पुढे म्हणतात, “झाड कधीच भेदभाव करत नाहीत, त्यांच्याकडून हा गुण घेण्यासारखा आहे. भारतातील आणि महाराष्ट्रातील झाडांसाठी काम करणाऱ्या लोकांचा हा पुरस्कार आहे. झाड अवघ्या मानवसृष्टीला अन्न आणि ऑक्सिजन देतात, त्यांना मी सलाम करतो. सर्वांनी झाडांसाठी काम केलं पाहिजे ऑक्सिजन घेता येणं बंद झालं की सगळं संपतं जी गोष्ट आपल्याला ऑक्सिजन देते त्या झाडांसाठी काम करा तुम्हाला नाही जमलं तर आम्ही करतोच आहोत.” (Latest Marathi News)
यावेळी सयाजी शिंदेंनी चंद्रकांत पाटील यांच्यासोबतचा एक किस्सा शेअर केला, “चंद्रकांत पाटील यांना मी एका कामासाठी फोन केला होता त्यांनी तात्काळ ते काम केलं तोपर्यंत आमची भेट झाली नव्हती. मला अनेक दिवसांपासून दादांना भेटायचं होतं, पण आमची भेट मुंबई एअरपोर्टवर झाली. तिथे आम्ही फारवेळ संवाद साधला.” (Marathi Actors)
सयाजी शिंदेंच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मराठी, हिंदी, तेलुगू, भोजपुरी सिनेसृष्टीसोबत अन्य सिनेसृष्टीतही काम केले. नुकताच सयाजी शिंदे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र आहे. (Marathi Film)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.