Sarthak Shinde Passed Away Due To Heart Attack Instagram
मनोरंजन बातम्या

Sarthak Shinde Dies: शिंदे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, आनंद शिंदे यांच्या पुतण्याचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Sarthak Shinde Passed Away: महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या शिंदे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Chetan Bodke

Sarthak Shinde Passed Away Due To Heart Attack: महाराष्ट्रातील प्रेक्षकांना आपल्या गाण्याने मंत्रमुग्ध करणाऱ्या शिंदे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक दिनकर शिंदेचं मंगळवारी निधन झालं आहे. सार्थकचं निधन नांदेडमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने झालं आहे. त्याच्या निधनाविषयीची माहिती बिग बॉस फेम अभिनेता उत्कर्ष शिंदेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

प्रल्हाद शिंदेंचा नातू, आनंद शिंदे यांचा पुतण्या सार्थक शिंदे एक उत्कृष्ट तबला वादक असून त्याचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. सार्थक शिंदेचे ३१ जुलै रोजी निधन झाले असून त्याच्या भावाने अर्थात अभिनेता उत्कर्ष शिंदेने त्याच्यासाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. स्टोरी शेअर करत अभिनेत्याने माहिती दिली आहे.

इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत सार्थक शिंदे म्हणतो, “तुझ्यासारखा कलाकार होणे नाही. कायमच तुझी आम्हाला आठवण येईल.”, असा आशय त्याने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करताना दिले आहे. सार्थकच्या अशा अचानक एक्झिटने शिंदेशाहीतला एक तारा गमावल्याची भावना सोशल मीडियावर चाहत्यांनी व्यक्त केली आहे. (Singer)

सार्थक शिंदेबद्दल थोडक्यात सांगायचे तर, प्रल्हाद दिनकर शिंदे असं त्याचं नाव असून त्याने संगीत क्षेत्रात आपले नाव कमावले आहे. शिंदेघराणं हे भीम गीतासाठी आणि आंबेडकरी गीतासाठी प्रसिद्ध आहे. या घराण्याने आजवर अनेक गाणे गायले आहेत. सार्थकने आजोबा आणि काकांकडून संगीताचे बाळकडू घेत गायन क्षेत्रात पाऊल ठेवले. त्याने अनेक कार्यक्रमात तबला वादन केलं आहे. सार्थकच्या अचानक एक्झिटने संगीत क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुढच्या वर्षी लागणार शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबतचा निकाल

जम्मू-काश्मीर विधानसभेत कलम ३७० वरून राडा, भाजप आमदारांनी प्रस्तावाच्या प्रती फाडून फेकल्या, VIDEO

NCP Symbol Hearing : पुढील ३६ तासांत... पक्ष आणि घड्याळ चिन्हावरून सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला निर्देश

Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुंबईतच मुंबईकरांना शब्द; लाडकी बहीण, धनुष्यबाण चिन्ह, टोलमाफीवरही सर्व काही बोलले!

Relationship Tips: ब्रेकअप का होतो? ही आहेत प्रमुख कारणे

SCROLL FOR NEXT