Director Sanoj Mishra saam tv
मनोरंजन बातम्या

Crime News: मोनालिसाला चित्रपटात काम देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक; अत्याचार केल्याचा आरोप

Director Sanoj Mishra: मोनालिसाला चित्रपटात काम देण्याची ऑफर देणारा दिग्दर्शक सनोज मिश्रा याला अटक करण्यात आलीय. त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय.

Bharat Jadhav

मोनालिसाला चित्रपटात काम देण्याचे आश्वासन देणाऱ्या दिग्दर्शकाला अटक करण्यात आली आहे. दिग्दर्शक सनोज मिश्राला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. सनोज मिश्रा यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप करण्यात आलाय. अभिनेत्री होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या एका मुलीवर सनोज मिश्रा यांनी अत्याचार केला आहे, असा आरोप पोलिसांनी केलाय. सनोज मिश्रा यांनी दिल्ली हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर करीम पोलिसांनी त्यांना अटक केली. .

सनोज याने चित्रपटात भूमिका देण्याच्या बहाण्याने पीडितेला आपल्याकडे बोलावले होते. सनोज मिश्रा यांनी तिचे शारीरिक शोषण केले. तिच्यासोबत घडलेला प्रकाराविषयी तिने कोणाला सांगितले तर तिला चित्रपटसृष्टीत काम मिळणार नाही, अशी धमकीही मिश्राने दिली होती. याप्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू करत सनोज यांना अटक केलीय.

मोनालिसाचं नाव आलं चर्चेत

सोशल मीडियावर महाकुंभ मेळ्यात रुद्राक्ष माळांची विक्री करणाऱ्या मोनालिसाचे फोटो व्हायरल झाले होते. मोनालिसा तिच्या सौंदर्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर दिग्दर्शक सनोज मिश्रा यांचे नाव चर्चेत आले होते. फोटो व्हायरल झाल्यानंतर सनोज मिश्रा यांनी मोनलिसाला चित्रपटात काम देण्याची ऑफर दिली होती. सनोज मिश्रा यांनी मोनालिसाला ‘द डायरी ऑफ मणिपूर’ नावाच्या चित्रपटात काम देण्याची ऑफर दिली होती.

सनोज मिश्रा यांनी मोनालिसाच्या घरी जाऊन तिला चित्रपटाची ऑफर दिली होती. त्यानंतर मिश्रा यांनी मोनालिसाची ट्रेनिंग सुरू केली होती. परंतु आता बलात्काराच्या आरोपाखाली सनोज मिश्रा यांना अटक झाली आहे. त्यामुळे त्यांच्या वर्तनावर आणि त्यांच्या प्रतिमेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुंभमेळ्यातील फोटो व्हायरल झाल्यानंतर मोनालिसाचे नाव चर्चेत आले होते. त्यानंतर सनोज मिश्रा यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली होती. मिश्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! सप्टेंबरचा ₹१५०० चा हप्ता कधी येणार? आज होणार निर्णय, महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Cabinet Reshuffle: मोठी बातमी! दिवाळीआधी मोदी सरकारमध्ये मोठे फेरबदल, ५ नवीन शिलेदारांना मंत्रिमंडळात संधी

Fort : इतिहासप्रेमींसाठी खास ठिकाण! डोंगराच्या माथ्यावर वसलेल्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे 'हा' किल्ला

रेल्वे प्रवाशांना मोठा झटका! जळगावसाठी धावणाऱ्या गरीब रथ, सेवाग्रामसह ५ गाड्यांचे मार्ग बदलले; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT