Madhuri Dixit buys a new house in Worli Saam TV
मनोरंजन बातम्या

Madhuri Dixit House: माधुरीचं मुंबईत आलिशान घर; महिन्याला घरभाडं १२.५ लाख रुपये...

Madhuri Dixit House In Mumbai: मुंबईच्या वरळी येथील हाय राईझ अपार्टमेंन्टच्या (High Rise Apartment) २९ व्या मजल्यावर माधुरीचं आलिशान घर आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिनं मुंबईत एक आलिशान घर घेतलयं. या घराचं घरभाडं हे दर महिन्याला तब्बल साडेबारा लाख (12,50000) रुपये असून या घराचा कार्पेट एरिया हा देखील तब्बल ५५०० चौरस फूट इतका आहे. या आलिशान घरात माधुरी ही (Madhuri Dixit) पती डॉ. श्रीराम नेने यांसह मुले रियान आणि अरिन यांच्यासोबत राहणार आहे. मुंबईच्या वरळी (Worli) येथील हाय राईझ अपार्टमेंन्टच्या (High Rise Apartment) २९ व्या मजल्यावर माधुरीचं आलिशान घर आहे.

हे देखील पहा -

माधुरी नुकतीच न्यूयॉर्कहून भारतात दाखल झाली आहे. त्यानंतर तिने मुंबईत हे घर बुक केलं. या घराचं माधुरीनं इंटिरियर बदलून घेतलं आहे. प्रसिद्ध डिझाईनर अपूर्वा मेहता यांनी माधुरीचं घर केवळ ४५ दिवसांमध्ये अतिशय आकर्षक, आलिशान आणि माधुरीला हवं तसं डिझाईन केलयं. बेडरुम, किचन, हॉल, डायनिंग रुम, ड्रॉईंग रुम, गॅलरी, बाथरुम सगळं काही अतिशय बारकाईने डिझाईन करण्यात आलं असून आता माधुरीच्या घराचे फोटो व्हायरल होत आहे. lythdesign नावाच्या इंस्टाग्राम पेजवरुन हे फोटोज् शेयर करण्यात आले आहेत. याच पेजवरच्या एका व्हिडिओमध्ये माधुरी डिझायनर अपुर्वा मेहताचं कौतुक करताना दिसत आहे.

कामाबद्दल बोलायचं झालं तर, माधुरी दीक्षित अलीकडेच OTT प्लॅटफॉर्म Netflix वर 'द फेम गेम' या वेब सीरिजमध्ये दिसली होती. तिच्यासोबत संजय कपूर आणि मानव कौलही मुख्य भूमिकेत होते. ही वेब सिरीज चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली होती. सकारात्मक प्रतिसादही मिळाला. समीक्षकांनीही त्याचे कौतुक केले. माधुरी दीक्षितचा हा डिजिटल डेब्यू होता, ज्यामध्ये ती प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झाली.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

मुग, मटकी, वटाणा... कडधान्य १ महिना खाल्ली नाहीत तर शरीरावर काय परिणाम होईल?

Shiv Sena Dispute: पक्षाची रचना आम्ही ठरवू, 'मुख्य नेता हे पद आलं कुठून?' कपिल सिब्बलांचा आक्रमक युक्तीवाद,आज कोर्टात काय-काय घडलं?

SCROLL FOR NEXT