Madhurani Prabhulkar Share A Post Saam Tv
मनोरंजन बातम्या

Madhurani Prabhulkar Share A Post: अरुंधतीने शेअर केला 'आई'चा रियल लाईफ स्ट्रगल; मुलीला वेळ देऊ शकत नसल्याने व्यक्त केली खंत

Aai Kuthe Kay Karte Actress Share Video: व्यस्त शेड्युलमुळे मधुराणीला मुलीला वेळ द्यायला मिळत नसल्याने व्यक्त केली खंत.

Pooja Dange

Madhurani Prabhulkar Share Her Real Life Struggle: अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर 'आई कुठे काय करते' या मालिकेतून प्रसिद्धी झोतात आली. तिच्या अरुंधती या भूमिकेला तुफान लोकप्रियता मिळत आहे. 'आई कुठे काय करते' ही मालिका टीआरपी रेटिंगमध्येही टॉप आहे. पण व्यस्त शेड्युलमुळे मधुराणीला तिच्या मुलीला वेळ द्यायला मिळत नसल्याची खंत तिने व्यक्त केली आहे.

मधुराणीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करत मुलीला पुरेसा वेल देता येत नसल्याचे बोलून दाखवले आहे. सध्या मधुराणी मुलगी स्वरालीसोबत ऑस्ट्रलियाला गेली आहे. ऑस्ट्रेलिया ट्रिप ती मुलीसोबत एन्जॉय कर आहे. या पोस्टमधून मधुराणीने तिचे ऑस्ट्रेलियालाच ट्रिपला जाण्याचे कारण देखील सांगितले आहे.

मधुराणीने ऑस्ट्रेलिया जाण्याचा संपूर्ण प्रवास सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. नुकतंच मधुराणीने एक व्हिडिओ शेअर भावना व्यक्त केल्या आहेत. मधुराणीने लिहिले आहे की, 'गेली ३ वर्षं माझं एक विशिष्ट रूटीन झालंय. ७/८ दिवस मुंबईत शूट करायचं आणि २/३ दिवस पुण्यात स्वरालीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवायचा. सोपं नव्हतं, नाहीये.... long distance parenting तेही लेकीचं खूप कठीण असतं हो...

गेल्या ३ वर्षात सलग असे ८/१० दिवस मी तिच्यासोबत घालवू शकलेले नाही. याची रुखरुख असते, अपराधीपण असतं.. आणि खूप ताण असतो. माझी ही अवस्था ईश्वराला समजली असणार आणि माझ्यासमोर ऑस्ट्रेलिया ट्रिपची ही संधी चालून आली. ह्या सगळ्याचा योग जुळवून आणणारा नेक माणूस म्हणजे सिडनीत राहणारा, कविमानाचा उमेश थत्ते.

एक दिवस अचानक त्याचा फोन आला 'मी तुझ्या 'कवितेचं पान'चा मोठा फॅन आहे... इथे काही कवी आहेत... तुझा एपिसोड इथे करता येईल का ? ' मी म्हंटलं, ' मला आवडेल पण स्वरालीला घेऊन येऊ शकत असेन तरच मी येते.' त्यांनी माझी विनंती क्षणाचाही विचार न करता मान्य केली आणि हे सारं घडवून आणलं...

'आई... 'च्या टीम ने पण प्रंचड cooperate करत मला इतके दिवस सुट्टी घेऊ दिली. तिथले एपिसोड छान झालेच आणि माझी आणि स्वरलीची ही सुट्टी अगदी संस्मरणीय ठरली.'

'आई कुठे काय करते' मालिकेत देखील अरुंधती तिला संधी मिळाल्याने गायनाचा कार्यक्रम करण्यासाठी सिडनीला जात असल्याचे दाखवले आहे. तर दुसरीकडे निराश होत यश जीवन संपविण्याचा निर्णय घेतो. परंतु आशुतोष त्याला यातून वाचवतो आणि वडिलांसारखा त्याच्या पाठीशी उभा राहतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT