Maa Box Office Collection Day 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Maa Box Office Collection Day 2: काजोलच्या 'मां'ने मोडला या ८ चित्रपटांचा रेकॉर्ड; दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Maa Box Office Collection Day 2: काजोलचा 'मां' हा एक पौराणिक भयपट आहे. या चित्रपटात काजोल आई अंबिकाच्या भूमिकेत दिसते.

Shruti Kadam

Maa Box Office Collection Day 2: बॉलिवूड अभिनेत्री काजोलचा 'मां' हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट २७ जून २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. अजय देवगणच्या सुपरहिट चित्रपट 'शैतान' च्या विश्वातील पुढील चित्रपट 'मां' ला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहेत. पण, काजोलने या चित्रपटात तिच्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. 'मां' बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करत आहे. आता 'मां'च्या दुसऱ्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आले आहे.

मां

काजोलचा 'मां' हा एक पौराणिक भयपट चित्रपट आहे. या चित्रपटात काजोल माँ अंबिकाच्या भूमिकेत दिसते. चित्रपटात काजोल आपल्या मुलीला दुष्ट आत्म्यापासून वाचवण्यासाठी तिच्या जीवाचीही पर्वा करत नाही. आई आणि मुलीतील हे नाते प्रेक्षकांना आवडले आहे. या चित्रपटाला आठवड्याच्या शेवटी पूर्ण फायदा मिळाला आहे. काजोलच्या 'मां'ने पहिल्या दिवशी ४.६५ कोटी रुपयांची कमाई केली.

आता दुसऱ्या दिवसाचे म्हणजेच शनिवारी बॉक्स ऑफिसवरील रिपोर्ट्स समोर आले आहेत. सॅकनिल्कच्या सुरुवातीच्या रिपोर्ट्सनुसार, 'मा'ने दुसऱ्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ५.६५ कोटी रुपये कमावले आहेत. अशा परिस्थितीत आता त्याचे एकूण कलेक्शन १०.३० कोटी रुपये झाले आहे.

'मां'ने २०२५ च्या या ८ चित्रपटांचा विक्रम मोडला

काजोलचा 'मां' बॉक्स ऑफिसवर आमिर खानच्या 'सितारे जमीन पर', 'कन्नप्पा' या चित्रपटांशी स्पर्धा करत आहे. त्याच वेळी, 'मा'ने २०२५ च्या या ८ चित्रपटांच्या कलेक्शनचा विक्रम फक्त दोन दिवसांत मोडला आहे. या यादीत लव्हयापा - ६.८५ कोटी रुपये, सुपरबॉईज ऑफ मालेगाव - ५.३२ कोटी रुपये, बॅडअॅस रविकुमार - ८.३८ कोटी रुपये, चिडिया - ८ लाख रुपये, द भूतनी - ९.५७ कोटी रुपये, केसरी वीर - १.५३ कोटी रुपये, शिवर - १.५ कोटी रुपये, फुले - ६.८५ कोटी रुपये यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Bharti Singh : भारती सिंहनं कसं घटवलं वजन? वाचा सीक्रेट डाएट प्लान

Pune Crime : पुण्यातील कॉलेजबाहेर तुफान राडा! टोळक्याकडून विद्यार्थीला बेदम मारहाण, वासा डोक्यात मारला अन्...

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये ठाकरे गटाकडे फक्त ४ नगरसेवक

Reliance Jio: रिलायन्स जिओचा नवा धमाकेदार प्लॅन, ४० जीबी डेटा आणि मोफत OTT सबस्क्रिप्शन

गाडीच्या चाकाखाली आला चिमुकला; आईच्या किंचाळ्या ऐकून काळीज हादरेल

SCROLL FOR NEXT