Gauri khan News Saam tv
मनोरंजन बातम्या

FIR against Gauri Khan : शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या विरोधात एफआयआर दाखल; नेमकं काय आहे प्रकरण?

शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे.

Vishal Gangurde

FIR Lodge Against Shahrukh Khan's Wife Gauri Khan : शाहरुख खानच्या 'पठान' सिनेमाने हजार कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. शाहरुखने 'पठान' सिनेमातून जोरदार कमबॅक केलं आहे. याचदरम्यान, शाहरुख खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी हाती आली आहे.

शाहरुख खानची पत्नी गौरी खानच्या विरोधात एफआयआर दाखल झाला आहे. लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. आयपीसी ४०९ अंतर्गत हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

रिपोर्टनुसार, तुलसियानी कंट्रक्शन अँड डेव्हलपर्स लिमिटेडचे सीएमडी अनिल कुमार , डायरेक्टर महेश तुलसियानी आणि शाहरुख खानची (Shahrukh Khan) पत्नी, कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खान विरोधात एफआयर दाखल करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, एफआयआरमध्ये बांधकाम व्यावसायिकांवर आरोप आहे की, लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी परिसरातील तुससियानी गोल्फ व्ह्यू इमारतीत एका फ्लॅटसाठी एका व्यक्तीने ८६ लाख रुपये दिले होते. या व्यक्तीने प्लॅट खरेदीचे ८६ लाख रुपये पैसे मोजल्यानंतरही त्या व्यक्तीच्या ऐवजी दुसऱ्याच व्यक्तीला या फ्लॅटची विक्री करण्यात आली.

तक्रारदाराने गौरी खानच्या विरोधात देखील एफआयआर दाखल केला आहे. त्यामागचे कारण सांगताना तक्रारदाराने स्पष्ट केले की, गौरी खान या कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडर असून त्यांच्या प्रचार-प्रसारास प्रभावित होऊन मी प्लॅट बुक केला.

काय आहे प्रकरण?

रिपोर्टनुसार, मुंबईच्या (Mumbai) अंधेरी पूर्व भागात राहणारे किरीट जसवंत शहा यांनी हा एफआयर दाखल केला आहे. या पीडित व्यक्तीचं म्हणणं आहे की, त्यांनी इमारतीत प्लॅट खरेदी करण्यासाठी ८६ लाख रुपये दिले होते. कंपनीला वेळेवर पैसै देऊनही त्यांनी प्लॅट दिला नाही. या कंपनीच्या ब्रँड अॅम्बेसेडर गौरी खानच्या (Gauri Khan) प्रचाराला प्रभावित होऊन त्यांनी फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी गौरी खानच्या विरोधात लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी परिसरातील पोलिसांत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. कंपनीने त्यांना ऑक्टोबर २०१६ मध्ये प्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु कर्ज काढून प्लॅटचे सर्व पैसे देऊन प्लॅटचा ताबा न मिळाल्याने एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी २५ फेब्रुवारी रोजी लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्याच एफआयर दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shravan Somvar Vrat: श्रावणी सोमवारच्या उपवासाला काय खावे अन् काय खाऊ नये

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Safe Dating Tips: डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या व्यक्तीसोबत डेटला जाताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

SCROLL FOR NEXT