Paresh Rawal Casts His Vote In Mumbai Saam Tv
मनोरंजन बातम्या

Paresh Rawal News : "मतदान न करणाऱ्यांना सरकारने कडक शिक्षा द्यायला हवी"; अभिनेते परेश रावल संतापले

Lok Sabha Election Voting Paresh Rawal : बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी सपत्नीक मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला.

Chetan Bodke

आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. आज महाराष्ट्रात ईशान्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी आणि धुळे या लोकसभेच्या जागांसाठी निवडणुका होत आहेत. ही महाराष्ट्रातली शेवटच्या टप्प्यातली निवडणुक आहे. सकाळी ७ वाजल्यापासून सामान्य नागरिकांसह अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी घराबाहेर पडत मतदानाचा हक्क बजावत आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी सपत्नीक मुंबईमध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांसोबत संवाद साधला.

मतदान न करणाऱ्यांवर अभिनेते परेश रावल यांनी राग व्यक्त केला आहे. माध्यमांसोबत संवाद साधताना अभिनेते परेश रावल म्हणाले, " अनेक लोकं म्हणतात, सरकार हे काम नाही करत, ते काम नाही करत. जर तुम्ही आज मतदानाचा हक्क बजावला नाही तर योग्य लोकप्रतिनिधी न निवडण्यासाठी तुम्ही जिम्मेदार आहात. आता तुमची पाळी आहे, ज्याने तुमच्या हितासाठी काम केले आहे, त्याला मत द्या. ज्यांनी मतदान नाही केले त्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. जे मतदार मतदान करणार नाहीत, त्यांना सरकारने शिक्षा द्यायला हवी. याला सरकार जबाबदार नाही."

अक्षय कुमारसोबतच जान्हवी कपूर, फरहान अख्तर आणि झोया अख्तर आणि राजकुमार रावने मतदानाचा अधिकार बजावला आहे. काल अनेक सेलिब्रिटींनी मतदान करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. शाहरुख खान, अक्षय कुमारने नागरिकांनी मतदान करण्यास सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT