Dr. Mohan Agashe Received Punyabhushan Award Saam TV
मनोरंजन बातम्या

Dr. Mohan Agashe Honored With Punyabhushan Award : दिग्गज ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे ३४ व्या पुण्यभूषण पुरस्काराने सन्मानित

Dr. Mohan Agashe : ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना या वर्षी ३४ वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

Pooja Dange

Dr. Mohan Agashe Received Punyabhushan Award : पुण्यभुषण फाऊंडेशनच्यावतीने देण्यात येणारा पुण्यभूषण पुरस्काराचा वितरण सोहळा आज पार पडला आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांना या वर्षी ३४ वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

अभिनेते अनुपम खेर, शर्मिला टागोर, रघुनाथ माशेलकर, प्रतापराव पवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला आहे. बालगंधर्व रंगमंदिरात या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. (Latest Entertainment News)

डॉ. मोहन आगाशे यांची पुण्यभूषण पुरस्काराची निवड डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्ष्यतेखाली असलेल्या समितीने केली आहे. अनुपम खेर आणि शर्मिला टागोर यांच्या हस्ते डॉ. मोहन आगाशे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मोहन आगाशे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.

स्मृतिचिन्ह आणि रूपये एक लाख रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरणाऱ्या बालशिवाजींची प्रतिकृती आणि पुण्याच्या ग्रामदैवतांचे छायाचित्र असलेले स्मृतिचिन्ह हे या पुरस्कारचे वैशिष्ट्य आहे. याबरोबरच कर्तव्य बजावित असताना जखमी झालेल्या ५ जवानांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित गौरव करण्यात येणार आहे.

अभिनेते मोहन आगाशे हे मानसशात्रज्ञ आहेत. त्यांनी हिंदी-मराठी व्यतिरिक्त दाक्षिणात्य चित्रपटामध्ये काम केले आहे. त्यांनी अनेक वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'जैत रे जैत' मधील नाग्या तसेच घाशीराम कोतवाल ह्या त्याच्या गाजलेल्या भूमिका आहेत.

कारखानीसांची वारी, तूफान, बच्चन पांडे, चंद्रमुखी या चित्रपटही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. तसेच दिथी या चित्रपटाचे ते निर्माते होते. झी 5 वरील हुतात्मा आणि रानबाजार या वेबसीरीजमध्ये त्यांनी काम केले आहे.

Mumbai Traffic: मुंबईत तयार होतोय केबल- स्टे ब्रिज, मढ-वर्सोवा दीड तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांत

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT