मनोरंजन बातम्या

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Lawrence Bishnoi Gang Threat: गायक-रॅपर बादशाहचे हरियाणवी गाणे "टेट्टीरी" रिलीज झाल्यापासून वादात सापडले आहे. आता या वादात लॉरेन्स बिश्नोई टोळीने उडी घेतली असून सोशल मीडिया पोस्टमध्ये बादशाहला धमकी दिली आहे.

Bharat Jadhav

  • गायक-रॅपर बादशाहच्या ‘टेट्टीरी’ गाण्यावरून वाद निर्माण.

  • लॉरेन्स बिश्नोई टोळीने सोशल मीडियावरून बादशाहला जीवे मारण्याची धमकी दिली.

  • ‘पुढच्या वेळी थेट माथ्यात गोळी घालू’ अशी धमकी पोस्टमध्ये.

'अगली बार सीधे तेरे माथे में गोली मारेंगे' अशी फेसबूक पोस्ट करत बिश्नोई गँगने बॉलिवूड गायक बादशाहाला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गायक-रॅपर बादशाहच्या हरियाणवी गाणे "टेट्टीरी" भोवतीच्या वादात लॉरेन्स बिश्नोई टोळीने उडी घेतली आहे. (Lawrence Bishnoi gang threatens rapper Badshah over Tettiri song)

बिश्नोई गँगने फेसबूक पोस्टच्या माध्यमातून पानिपत गोळीबार घटनेची जबाबदारी स्वीकारली आणि गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. पुढच्या वेळी तुझ्या माथ्यात गोळी घालून अशी धमकी त्यांनी दिली आहे. बादशाह त्याच्या गायनाने हरियाणाची संस्कृती खराब करत असल्याचं गँगने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे कथित गुंड रणदीप मलिक आणि अनिल पंडित (यूएसए) यांनी शनिवारी, १४ मार्च रोजी पानिपतमधील असांध रोडवरील वेस्टर्न युनियन कार्यालयात झालेल्या अंदाधुंद गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये, टोळीने म्हटले आहे की, हा गोळीबार हवाला व्यापाऱ्यांवरील कारवाईचा एक ट्रेलर होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

SCROLL FOR NEXT