Ashish Patil Sundari Lavni Teaser Instagram
मनोरंजन बातम्या

Ashish Patil: आशिष पाटीलची ‘सुंदरी’ पाहिलीत का?, Video तील नजाकती पाहतच राहाल...

Ashish Patil New Song: लावणी किंग म्हणून मराठी कलाविश्वात प्रसिद्ध असणाऱ्या आशिष पाटीलचे ‘सुंदरी’ या म्युझिक व्हिडीओचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Chetan Bodke

Ashish Patil Sundari Lavni Teaser

फक्त मराठी टेलिव्हिजनसृष्टीतच नाही तर, बॉलिवूडमध्येही लावणी किंग म्हणून आशिष पाटीलची ओळख आहे. त्याने आपल्या ठसकेबाज लावणीने आणि आपल्या घायाळ अदांनी सर्वांनाच मोहून टाकले. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘चंद्रमुखी’ तील ‘चंद्रा’ गाण्याने तो सर्वाधिक प्रकाशझोतात आला. सध्या आशिष पाटील ‘ढोलकीच्या तालावर’ या प्रसिद्ध रिॲलिटी शोचं परिक्षण करीत आहे. लावणी किंग म्हणून मराठी कलाविश्वात प्रसिद्ध असणाऱ्या आशिष पाटीलचे ‘सुंदरी’ या म्युझिक व्हिडीओचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

लावणी किंग आशिष पाटीलचा हा पहिलावहिला म्युझिक व्हिडीओ असून गाण्याचे दिग्दर्शन, नृत्यदिग्दर्शन आणि सादरीकरण खुद्द आशिष पाटीलने स्वत:च केले आहे. आशिष पाटील आणि गिरिजा गुप्ते निर्मित गाण्याला अवधूत गुप्ते यांनी आपला आवाज दिला आहे. तर प्रवीण कुवर यांनी गाणं संगीतबद्ध केले असून मंदार चोळकर हे गाण्याचे गीतकार आहेत. एकवीरा म्युझिक प्रस्तुत, ‘सुंदरी’ या गाण्याचे छायाचित्रण हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे. सुंदरी’च्या निमित्ताने प्रेक्षकांना लवकरच एक नृत्याविष्कार अनुभवायला मिळणार आहे. (Song)

गाण्याविषयी आशिष पाटीलने सांगितले, “बाप्पाचा आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी आहे. बाप्पाच्या आशीर्वादानं मी ‘सुंदरी’ प्रेक्षकांच्या समोर सादर करीत आहे. मला खात्री आहे की, माझं हे पहिलंवहिलं गाणं प्रेक्षकांच्या नक्कीच पसंदीस उतरेल. प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादामुळेच मी इथपर्यंतचा प्रवास करू शकलो. त्यासोबतच या पुढील माझ्या प्रवासात माझ्या प्रयत्नांना नेहमीच प्रेक्षकांची साथ महत्वाची असेल. ‘सुंदरी’चा प्रोमो प्रदर्शित झाला असून मला चाहत्यांकडूनच नाही तर अनेक सेलिब्रिटी मित्रांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. सर्वांच्याच प्रतिक्रिया मला निश्चितच प्रेरणादायी ठरत आहेत.” (New Song)

अवधूत गुप्तेनेही गाण्याबद्दल सांगितले, “आशिषसोबत काम करतानाचा अनुभव माझ्यासाठी खुप चांगला होता. आशिषच्या डान्सबद्दल मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. त्याच्या लावणीतल्या नजाकती खूपच आकर्षक आहेत. ‘सुंदरी’च्या रूपाचे शृंगारिक वर्णन या गाण्यात केले आहे. २ ॲाक्टोबरला ‘सुंदरी’ अवतरणार आहे.” (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT