Gautami Patil SAAM TV
मनोरंजन बातम्या

Gautami Patil : गौतमीला 'बिग बॉस'कडून ऑफर, पाटलीन बाईंनी काय घेतला निर्णय?

Gautami Patil Bigg Boss Marathi Offer : बिग बॉस मराठी ५ साठी नृत्यांगणा गौतमी पाटील हिला ऑफर आली होती. यासंबंधी तिने मोठा खुलासा केला आहे. तिने त्या ऑफरला काय उत्तर दिले जाणून घेऊयात.

Shreya Maskar

सध्या सर्वत्र बिग बॉस मराठीची (Bigg Boss Marathi ) चर्चा पाहायला मिळत आहे. हा शो प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन करताना दिसत आहे. बिग बॉस मराठी सीझन पाचमध्ये रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. यंदाचा बिग बॉस मराठी तुफान चालत आहे. या शोला प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. बिग बॉस सुरू होण्याआधी अनेक सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा होती. मात्र अनेक कलाकारांनी या ऑफर देखील नाकारल्या आहेत. यात लावणी स्टार गौतमी पाटील हीचा देखील समावेश आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, नृत्यांगणा गौतमी पाटील हिला देखील बिग बॉस मराठीची ऑफर आली होती. पण तिने ती नाकारली. लावणी स्टार गौतमी पाटील ही नेहमी तिच्या नृत्याच्या शैलीमुळे चर्चेत असते. गौतमीची लावणी पाहायला अनेक लोक जातात. तिचा सोशल मिडियावर देखील मोठा चाहतावर्ग आहे. यंदा गौतमी पाटील बिग बॉसच्या घरात दिसणार याची चर्चा रंगली होती. नुकतीच गौतमीने या बातम्यांवर आपले मत मांडले आहे. गौतमी पाटील (Gautami Patil) म्हणाली की, 'मला बिग बॉसकडून ऑफर आली होती, पण ती मी नाकारली.' यावर गौतमी पाटीलने बिग बॉसची ऑफर का नाकारली, हे जाणून घेण्यासाठी चाहते आतुर झाले.

मिडिया रिपोर्टनुसार, गौतमीला बिग बॉस मराठीची ऑफर आली होती, पण तिने नाकारली. कारण तिचे लावणीचे प्रोगाम आधीच प्लान केले होते. म्हणजे कामामुळे गौतमी यंदा बिग बॉसमध्ये पाहायला मिळाली नाही. दहीहंडी, गणपती हे सण त्या काळात होते आणि गौतमीने आधीच आपले शो बुक केले होते. तसेच गौतमी पाटील हिने भविष्यात बिग बॉसमध्ये सहभागी होता आले तर नक्की जाईल, अशी इच्छा व्यक्त केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाटकं करू नये - चव्हाण

U19 Asia Cup : भारत-पाकिस्तानमध्ये आज हायव्होल्टेज ड्रामा, वैभव सुर्यवंशी धमाल करणार, कधी होणार सामना?

Night Shower Benefits: शांत झोप आणि दीर्घायुष्याचं सिक्रेट! रात्री आंघोळ करण्याचे फायदे

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! 'ही' प्रोसेस ३१ डिसेंबर पर्यंत करा, अन्यथा खात्यात येणार नाही हप्ता

Mahadhan Rajyog: 16 डिसेंबर रोजी या राशींचं नशीब पलटणार; ग्रहांचा राजा सूर्य बनवणार शक्तीशाली योग

SCROLL FOR NEXT