Lata Mangeshkar Corona Positive Saam TV
मनोरंजन बातम्या

Lata Mangeshkar: गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण

मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीमधील प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केलं आहे.

सूरज सावंत

मुंबई : मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीमधील ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) दाखल केलं आहे. तसंच लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे वय पाहता त्यांना साथीच्या आजाराने ग्रासल्यानंतर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. (Lata Mangeshkar Corona Positive Latest News)

लता मंगेशकर यांना त्यांची भाची रचना हिने कोविड-19 (Covid-19) ची लागण झाल्याची माहिती दिली आहे. रचना यांनी सांगितले की, लता मंगेशकर यांना कोरोनाच्या किरकोळ लक्षणांसह रुग्णालयात आणण्यात आले आहे. सध्या त्या बऱ्या आहेत, काळजी करण्यासारखे काही नाही, केवळ खबरदारीच्या कारणास्तव त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान लतादीदींना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत, त्यांना सध्या ऑक्सिजनची गरज नाही. जिथे ऍडमिट केलं आहे तेथिल डॉक्टर्स नक्कीच चांगली काळजी घेत असून लता मंगेशकर यांची तब्येत ठीक आहे. मी स्वतः डॉक्टरांच्या टीमला जाऊन आता भेटणार आहे, आणि भेटून विचारपूस करणार असल्याचही महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : पुण्यात गोळीबाराचा थरार; महिलांसह तिघांवर गुन्हा

Eating Curd At Night: उन्हाळ्यात रात्री दही खावा की नाही?

Homemade Rice Cream For Face: चेहऱ्यावर नॅचरल ग्लो हवाय? घरच्या घरी बनवा तांदळाची सोपी क्रिम

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये पुन्हा कारला आग; पार्किंग माफियावर संशय

Sunday Horoscope: कामाचा ताण वाढेल, ५ राशींनी खर्चावर नियंत्रण ठेवा; वाचा रविवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT