Lapandav Serial Saam Tv
मनोरंजन बातम्या

Lapandav Serial: 'लपंडाव' मालिकेमध्ये रुपाली भोसलेची डबल थरार; तेजस्विनी-मनस्विनीच्या वादात येणार मोठा ट्विस्ट

Lapandav Serial: स्टार प्रवाहवरील ‘लपंडाव’ मालिकेत रुपाली भोसलेच्या दुहेरी भूमिकेची चर्चा रंगली आहे. तेजस्विनी-मनस्विनी संघर्षात लवकरच मोठा ट्विस्ट येणार असून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Shruti Vilas Kadam

Lapandav Serial: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘लपंडाव’ मालिकेला सध्या प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मालिकेतील तेजस्विनी आणि मनस्विनी या दोन व्यक्तिरेखांमधील संघर्ष दिवसेंदिवस अधिकच रंगत चालला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारत असून तिच्या अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

दुहेरी भूमिका साकारणं हे कोणत्याही कलाकारासाठी मोठं आव्हान असतं. याबाबत रुपाली भोसले सांगते की, तेजस्विनी आणि मनस्विनी या पूर्णपणे भिन्न व्यक्तिरेखा आहेत. एकाच दिवशी या दोन्ही भूमिका साकारताना तिला मोठी कसरत करावी लागते. दोघींचे लूक, देहबोली आणि आवाज पूर्णपणे वेगळे ठेवावे लागतात.

तेजस्विनीचा लूक अत्यंत क्लासी आणि एलिगंट असून तिच्या साड्या, दागिने आणि मेकअपमध्ये शाही अंदाज दिसून येतो. त्याउलट मनस्विनीचा लूक साधा आणि नैसर्गिक ठेवण्यात आला आहे. मनस्विनी साकारताना ‘नो मेकअप’ लूक ठेवला जातो, ज्यामुळे त्या व्यक्तिरेखेला अधिक वास्तववादी स्पर्श मिळतो.

रुपाली भोसलेच्या या प्रभावी अभिनयामुळे प्रेक्षकदेखील भारावून गेले आहेत. अनेकदा चाहत्यांकडून तिला प्रत्यक्ष भेटल्यावर तुम्ही खरंच जुळ्या बहिणी आहात का? असा प्रश्न विचारला जातो. हे कौतुक तिच्यासाठी आनंददायी असलं तरी, अशा दुहेरी भूमिकेमुळे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकवा जाणवत असल्याचंही ती सांगते. मात्र, कलाकार म्हणून मिळणारं समाधान तिच्या मेहनतीचं चीज करतं.

दरम्यान, ‘लपंडाव’ मालिकेत लवकरच एक मोठा आणि थरारक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कथानकानुसार, तेजस्विनीचं अपहरण करण्यासाठी मनस्विनी भांडीवालीचा वेष धारण करणार आहे. रुपालीचा हा नवा अवतार प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवणार आहे. मालिकेतील हा थरार आणि नाट्य अनुभवण्यासाठी प्रेक्षकांनी ‘लपंडाव’ मालिका दुपारी २ वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE बोर्डचे पूर्ण नाव काय? नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण इतिहास

Maharashtra News Live Update: अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील ४ आरोपींना अटक

हॅकर्सची बोलती बंद; WhatsApp ची Security आणखी होणार तगडी, नवीन येणारे फीचर कसं काम करेल?

Ajinkya Rahane: चौथ्या पराभवासह अजिंक्य रहाणेला अजून एक मोठा झटका; BCCI ने केली कारवाई

घरातील Smart TV तुमच्यावरच ठेवतोय पाळत; वापरण्यापूर्वी 'अशी' बाळगा सावधगिरी

SCROLL FOR NEXT