Lagnanantar Hoilach Prem  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Lagnanantar Hoilach Prem : लग्नानंतर प्रेम फुलणार का? जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्याच्या नात्याची नवी इनिंग, पाहा VIDEO

Lagnanantar Hoilach Prem Serial Update :'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत नवीन वळण पाहायला मिळणार आहे. जीवा-नंदिनी अन् पार्थ-काव्यातील दुरावा मिटणार आहे.

Shreya Maskar

सध्या 'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanantar Hoilach Prem) मालिका रंजक वळणावर आली आहे. जीवा-नंदिनीला आणि काव्या-पार्थला मनवण्याचा प्रयत्न करत आहेत. यांच्या नात्यात आलेला दुरावा कसा मिटणार, हे पाहणे मालिकेत महत्त्वाचे ठरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत जीवा नंदिनीचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. तो तिच्यासाठी ऑम्लेट बनवतो. रिक्षावाला देखील बनतो. पण नंदिनीचा राग काही जात नाही.

दुसरीकडे काव्या पार्थचे मन जिंकण्यासाठी त्याला त्रास देते. त्याच्या गाडीची हवा काढून त्याच्यासाठी रिक्षा घेऊन येते. मात्र पार्थ उलटा तिच्यावर भडकतो. आता या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आला आहे. नवीन प्रोमोमध्ये नंदिनी आणि जीवा समुद्रकिनारी पावसात भिजताना दिसत आहेत. जीवा नंदिनीला म्हणतो की,"तुझं प्रेम वेड मला उशीरा कळलं थोड, सोडवूया का जरा आपल्या नात्याचं कोड"

जीवाला उत्तर देत नंदिनी म्हणत की, "आज रात्री माझ्याबरोबर डिनरला याल?" हे ऐकताच जीवाला खूप आनंद होतो. ते दोघे एकमेकांकडे पाहत राहतात. तर दुसरीकडे घरी काव्या पार्थला म्हणते की, "तुम्ही मला या नात्याच्या पलीकडे भेटला असता तर खूप छान जुळलं असत आपलं" तिच्या डोळ्यात पाणी येते. यावर उत्तर देत पार्थ काव्याला विचारतो की, तुम्ही माझ्याबरोबर आज रात्री लाँग ड्राईव्हला याल का?" हे ऐकताच काव्याची कळी खुलते.

जीवा-नंदिनी आणि काव्या-पार्थ घटस्फोट घेऊन वेगळे होणार की आपल्या नात्याला दुसरी संधी देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिक स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी 7.00 वाजता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

Mohammed Siraj : चेंडू बॅटला लागून स्टंपवर आदळला, इंग्लंडला शेवटची विकेट मिळाली अन् सिराजला मैदानावरच रडूच कोसळलं

SCROLL FOR NEXT