Lagira Zhala Ji fame Marathi Actress Kalyani Nandkishor 
मनोरंजन बातम्या

Marathi Actress: गाडी अडवली, पैसे मागितले अन् मारहाण केली...; 'लागिरं झालं जी' फेम अभिनेत्रीसोबत पुण्यात धक्कादायक प्रकार

Marathi Actress: ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यासोबत पुण्यात धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप आहे. गाडी अडवून पैसे मागितले आणि जबरदस्ती केल्याचे त्यांनी सांगितले.

Shruti Vilas Kadam

Marathi Actress: ‘लागिरं झालं जी’ या लोकप्रिय मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर यांच्यासोबत पुण्यात धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. नवले ब्रिज परिसरात काही व्यक्तींनी त्यांची गाडी अडवून वाद घातला आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभिनेत्रीने केला आहे. या घटनेदरम्यान आपल्याला मारहाण करण्यात आल्याचेही कल्याणी नंदकिशोर यांनी सांगितले आहे.

कल्याणी नंदकिशोर यांच्या म्हणण्यानुसार, त्या गाडीने प्रवास करत असताना नवले ब्रिज परिसरात काही जणांनी त्यांच्या गाडीला धडक दिली. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी त्यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. या वादानंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. मात्र, पैसे देण्यास त्यांनी नकार दिला. यानंतर परिस्थिती अधिक गंभीर झाल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर संबंधितांनी त्यांचा हात ओढून त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले. या झटापटीदरम्यान त्यांच्या हाताला दुखापत झाली.

या संपूर्ण घटनेनंतर अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. या व्हिडिओमध्ये त्यांनी घटनेची माहिती देताना आपल्याला आलेला अनुभव मांडला आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अभिनेत्रीने केलेल्या आरोपांनंतर या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, रस्त्यावर गाडी अडवून पैशांची मागणी करणे आणि त्यानंतर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न झाल्याच्या आरोपामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचे समोर आले आहे. नेमका वाद कशामुळे झाला, गाडीला धडक कशी बसली, संबंधित व्यक्ती कोण होत्या आणि अभिनेत्रीने केलेल्या आरोपांमध्ये नेमके तथ्य काय आहे, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer : जबड्याजवळ वेदना न होणारी गाठ? दुर्लक्ष करू नका; तज्ज्ञांनी सांगितली पॅरोटिड ट्यूमरची 7 लक्षणं

Maharashtra News Live Update: चाकणमध्ये भाईगिरीचा प्रताप! हॉर्न वाजवल्याच्या रागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसटीची तोडफोड

Lavangache Pani: रात्री झोपण्यापूर्वी प्या लवंगाचे पाणी, फक्त १५ दिवसांत दिसेल रिझल्ट

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या नाराजीनं वाढलं टेन्शन

Co-Ord Sets For Women: महिलांसाठी को-ऑर्ड सेटचे 5 लेटेस्ट पॅटर्न्स, जे अत्यंत स्टायलिश आणि कम्फर्टेबल

SCROLL FOR NEXT