Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचा साडीतील रॉयल लूक; पेस्टल गुलाबी-लाल साडीत दिसतेय अप्सरा

Shruti Vilas Kadam

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात लोकप्रिय

सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ने आठ वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. या कार्यक्रमामुळे अभिनेत्री शिवाली परब घराघरात पोहोचली आणि तिला मोठी लोकप्रियता मिळाली.

Shivali Parab

शिवालीचा हटके रॉयल अंदाज

शिवालीने नुकतेच रॉयल अंदाजातील खास फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

Shivali Parab

पेस्टल गुलाबी आणि लाल साडीची निवड

या फोटोशूटसाठी शिवालीने पेस्टल गुलाबी आणि लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे. पारंपरिक आणि आकर्षक रंगसंगतीमुळे तिचा लूक अधिक खुलून दिसत आहे.

Shivali Parab

भरजरी दागिन्यांनी वाढवला लूक

साडीवर शिवालीने निवडलेले भरजरी दागिने तिच्या रॉयल लूकला चारचाँद लावत आहेत. दागिन्यांमुळे तिचा पारंपरिक अंदाज आणखी उठून दिसतोय.

Shivali Parab

फोटोशूटमधील शिवालीचा आत्मविश्वास

शिवालीने या फोटोशूटमध्ये वेगवेगळ्या पोझ देत आपला सुंदर अंदाज दाखवला आहे. तिच्या या फोटोंमध्ये पारंपरिक सौंदर्य आणि ग्लॅमरस स्टाइलचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो.

Shivali Parab

खास कॅप्शनने वेधले लक्ष

या फोटोशूटसोबत शिवालीने “कोई जाके वैद बुलाओ.. आके धारे मोरी नारी.. हाए राम…” असे खास कॅप्शन लिहिले आहे. तिच्या कॅप्शनचीही सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Shivali Parab

चाहत्यांकडून लूकचे कौतुक

पेस्टल गुलाबी-लाल साडी, भरजरी दागिने आणि रॉयल अंदाजातील शिवालीचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. तिचा हा पारंपरिक लूक साडीप्रेमींसाठीही खास फॅशन इंस्पिरेशन ठरू शकतो.

Shivali Parab
Tomato Soup Recipe
येथे क्लिक करा