Tomato Soup Recipe: घरच्या घरी बनवा गरमागरम आणि चविष्ट टोमॅटो सूप, वाचा सोपा रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

टोमॅटो सूपसाठी ४-५ पिकलेले टोमॅटो, १ छोटा कांदा, ३-४ लसूण पाकळ्या, १ चमचा बटर, मीठ, काळी मिरी आणि थोडी साखर घ्या.

Tomato Soup

टोमॅटो शिजवून घ्या

टोमॅटो स्वच्छ धुवून मोठे तुकडे करा. एका भांड्यात थोडे पाणी घेऊन टोमॅटो, कांदा आणि लसूण मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.

Tomato Soup Recipe | yandex

मिश्रणाची प्युरी करा

शिजलेले टोमॅटो, कांदा आणि लसूण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. हवे असल्यास ही प्युरी गाळून घेतल्यास सूप अधिक स्मूद होईल.

Tomato Soup Recipe | yandex

प्युरी उकळून घ्या

कढईत बटर गरम करून त्यात टोमॅटोची प्युरी घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून सूप मध्यम आचेवर काही मिनिटे उकळू द्या.

Tomato Soup | yandex

चवीनुसार मसाले घाला

सूपमध्ये मीठ, काळी मिरी आणि चिमूटभर साखर घाला. टोमॅटो आंबट असल्यास थोडी साखर चव संतुलित करण्यास मदत करते.

Tomato Soup

सूपला क्रीमी टेक्स्चर द्या

सूप अधिक क्रीमी हवे असल्यास थोडे फ्रेश क्रीम किंवा दूध घालू शकता. मात्र हे पूर्णपणे ऐच्छिक आहे.

Tomato Soup | google

गरमागरम सर्व्ह करा

तयार टोमॅटो सूप एका बाऊलमध्ये काढा. त्यावर काळी मिरी, कोथिंबीर किंवा ब्रेड क्रुटॉन्स घालून गरमागरम सर्व्ह करा.

Tomato Soup | yandex

Fat Loss Tips: कमी खाऊनही वजन वाढतंय? पोटाची वाढलेली चरबी कमी करण्यासाठी करा 'या' सोप्या ५ गोष्टी

Fat Loss Tips
येथे क्लिक करा