Labhale Amhas Bhagya Show Instagram @planetmarathiott
मनोरंजन बातम्या

Labhale Amhas Bhagya: प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रेक्षकांसाठी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाची भेट

मराठी भाषेला लाभलेला साहित्याचा वारसा जपण्यासाठी प्लॅनेट मराठी ओटीटीवर 'लाभले आम्हास भाग्य' हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Chetan Bodke

Marathi Bhasha Din Special Show On Planet Marathi Ott: कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच प्रख्यात नाटककार, कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जयंती दिनानिमित्त दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी सर्वत्र जागतिक मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषेला लाभलेला साहित्याचा वारसा जपण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

या खास दिनाचे औचित्य साधून प्लॅनेट मराठी ओटीटीवर 'लाभले आम्हास भाग्य' हा विशेष कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचे लेखन, दिग्दर्शन पुष्कर श्रोत्री यांनी केले असून यात प्रमुख भूमिका आनंद इंगळे, पुष्कर श्रोत्री आणि संदीप पाठक यांनी साकारली आहे. एक तासाचा हा खास कार्यक्रम प्रेक्षकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता पाहता येणार आहे.

'लाभले आम्हास भाग्य' बद्दल दिग्दर्शक, अभिनेता पुष्कर श्रोत्री म्हणतात, "या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश कोणाला भाषा शिकवणे, उपदेश करणे हा नसून, आम्हाला मराठी भाषा बोलताना जो आनंद मिळतो, तो तुम्ही सुद्धा घ्यावा, हा एवढाच या मागचा उद्देश आहे. मुळात मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम आम्ही गंमतीजंमती, मजा करत केलेला असून मराठी भाषेचं वैभव दाखवण्याचा प्रयत्न आम्ही यातून केला आहे."

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "प्लॅनेट मराठी सुरु करण्याचा मुख्य उद्देशच हा आहे, की मराठी भाषेला लाभलेला साहित्याचा वारसा, संस्कृती जगभरातील प्रेक्षकांपर्यंत मनोरंजाच्या स्वरूपात पोहोचावी आणि म्हणुनच या खास दिनाचे निमित्त साधत आम्ही हा कार्यक्रम आमच्या प्रेक्षकांसाठी आणला आहे. यात हलक्याफुलक्या पद्धतीने मराठी साहित्याचे संवर्धन करण्याचा मोलाचा सल्ला देण्यात आला आहे. हा कार्यक्रम २७ फेब्रुवारीपासून प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Ganghi: मतं चोरुन मोदी पंतप्रधान बनले; राहुल गांधींचा आरोप

Crime News: महिलेच्या पाठीमागून आला अन्...; 'गला घोंटू' गँगची दहशत|Video Viral

Pranjal Khewalkar : एकनाथ खडसे खडसेंच्या जावयाचा पाय आणखी खोलात, रुपाली चाकणकरांचा मानवी तस्करीचा आरोप

Nanded News: कुत्रा चावल्यानं म्हैस दगावली; गावकरी पडले चिंतेत, लसीसाठी हॉस्पिटलमध्ये लावली रांग, कारण काय?

Raksha Bandhan : सरकारकडून रक्षाबंधनाला 2 हजारांचं गिफ्ट? लाडकींना रक्षाबंधनाला कॅशबॅक मिळणार?

SCROLL FOR NEXT