Laapataa Ladies Saam Tv
मनोरंजन बातम्या

Laapataa Ladies : ऑस्करसाठी 'लापता लेडीज'च्या दिग्दर्शकाने घेतला मोठा निर्णय, थेट नावचं बदललं

Laapataa Ladies Name Change: लापता लेडीज नाव बदलण्यात आलं आहे. नवीन नावाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. जे सध्या लक्ष वेधून घेत आहे.

Manasvi Choudhary

किरण राव दिग्दर्शित लापता लेडीज या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची कथा त्यातील पात्र या साऱ्यांमुळेच चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाची निवड ऑस्करसाठी करण्यात आली. पुढील वर्षी होणाऱ्या प्रतिष्ठित ऑस्कर सोहळ्यात लापता लेडीज भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. अशातच लापता लेडीज नाव बदलण्यात आलं आहे. नवीन नावाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहे. जे सध्या लक्ष वेधून घेत आहे.

लापता लेडीज या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर खास स्थान निर्माण केलं आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची जादू पाहायला मिळाली. अशातच चित्रपटाच्या नावामध्ये बदल करण्यात आलं आहे. 'lost ladies' असं नवीन नाव देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर नवीन नावाचं पोस्टर शेअर केलं आहे.

किरण राव आणि अमिर खान यांचा लापता लेडीज चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटात नितांशी गोयल, प्रतिभा रंटा, स्पर्श श्रीवास्तव आणि रवी किशन हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. अभिनेत्री छाया कदमने या चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील सजनी रे या गाण्याने अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. चित्रपटाचे निर्माते आमिर खान आणि दिग्दर्शक किरण राव यांनी नुकतंच न्यूयॉर्क शहरातही चित्रपटाचे प्रमोशन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक जिल्ह्यात घेणार तीन प्रचार सभा

Local Body Election : मोठी बातमी! बारामतीमध्ये २ प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर, कारण काय?

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

SCROLL FOR NEXT