Actor Vikas Sethi Dies At 48 INSTAGRAM
मनोरंजन बातम्या

Actor Vikas Sethi Dies : 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' फेम विकास सेठीचे निधन

'Kyuki Saas Bhi Kabhi Bahu Thi' Fem Dies At 48 : प्रसिद्ध अभिनेता विकास सेठी याचे वयाच्या ४८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. विकासने विविध टीव्ही शोज बरोबर सुपरहिट चित्रपट 'कभी खुशी, कभी गम' मध्ये करीना कापूरच्या मित्राची भूमिका साकारली होती.

Saam Tv

सास भी कभी बहू थी, कसौटी सारख्या टीव्ही सिरियलमध्ये काम केलेला टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता विकास सेठी याचे रविवारी निधन झाले आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी राहत्या घरी झोपेत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचे निधन झाले असल्याचे मीडिया रिपोर्टमधून सांगितले जात आहे.

विकास बऱ्याच उत्कृष्ट टीव्ही शो बरोबरच 'कभी खुशी कभी गम' या सुपरहिट चित्रपटात देखील दिसला होता. काही वर्षांपूर्वी तो आर्थिक अडचणींमुळे नैराश्यात असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्याचा मृत्यू झाला त्यावेळी त्याची पत्नी आणि मुले घरात होते.

अभिनेता विकास याने जान्हवीसोबत लग्न केले असून त्यांना जुळी मुले देखील आहेत. विकास सेठीने टीव्हीवरील लोकप्रिय ड्रामा शो 'क्यूंकी सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कही तो होगा', 'गीत हुई सबसे पराई', 'उत्तरन' आणि 'ससुराल सिमरका' मध्ये काम केले आहे. याशिवाय, विकास आपल्या पत्नी जान्हवीसोबत 'नच बलिएच्या' चौथ्या सीझनमध्ये देखील दिसला होता.

'कभी खुशी कभी गम' मध्येही दिसला होता विकास

विकास सेठी 2001 मध्ये आलेल्या 'कभी खुशी कभी गम' या सुपरहिट चित्रपटातही दिसला आहे. या चित्रपटात त्याने करीना कपूरचा कॉलेज मित्र रणधीर उर्फ रॉबीची भूमिका साकारली होती. विकास सेठीच्या आधी जॉन अब्राहमला ही भूमिका देण्यात आली होती.

मात्र कमी स्क्रीन टाइममुळे जॉनने चित्रपट नाकारला होता, त्यानंतर विकास सेठीला ही भूमिका मिळाली. याशिवाय विकास 2001 मध्ये आलेल्या दिवानापन चित्रपटातही दिसला आहे. तो शेवटचा तेलगू विज्ञान काल्पनिक चित्रपट इस्मार्ट शंकरमध्ये दिसला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT