Kushal Badrike As A Siddharth Jadhav Saam TV
मनोरंजन बातम्या

Chala Hawa Yeu dya Viral Video: माझा राग आहे... सिद्धार्थ बनत कुशलने सांगितली मनातली नाराजी

Kushal Badrike As A Siddharth Jadhav: अभिनेता कुशल बद्रिके सिद्धार्थ जाधवची भूमिका साकारणार आहे.

Pooja Dange

Kushal Badrike Video: अभिनेता सिद्धार्थ जाधव एक हरहुन्नरी अभिनेता आहे. सिद्धार्थच्या एनर्जीला तोड नाही. त्याची ही एनर्जी तो जाईल तिथे असते. पण यावेळी तो नसतानाही त्याच्या एनर्जीने मंच रंगत आणली. हा नाच होता 'चला हवा येऊ द्या'चा.

'चला हवा येऊ द्या'मध्ये 'महाराष्ट्र शाहीर'ची टीम प्रमोशनसाठी येणार आहे. दरम्यान यावेळी मंचावर एक स्किट सादर करण्यात येईल. या स्किटमध्ये डॉ. निलेश साबळे अभिजित बिचुकले सादर करणार आहेत. तर अभिनेता कुशल बद्रिके सिद्धार्थ जाधवची भूमिका साकारणार आहे.

कुशलने त्याच्या या स्किटचा एक व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच कुशलने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'आणि जेंव्हा सिद्धार्थ जाधव बनायची वेळ माझ्यावर येते.' या कापशांवरूनच तुम्ही समजू शकता की या स्किटमध्ये कुशलने किती धम्माल केली असेल.

व्हिडिओमध्ये दाखविण्यात आले आहे की, अभिजीत बिचुकले म्हणजेच नीलेश साबळे सिद्धार्थ जाधवला मंचावर आमंत्रित करतो. त्यानंतर उद्या मारत, डान्स करत विचित्र हावभाव करत सिद्धार्थ म्हणजे कुशल बद्रिके मंचावर येतो. कुशलची स्टाईल पाहून सगळे पाहुणे कलाकार पोट धरून हसू लागतात आणि सर्व स्किट आनंद घेत असतात.

कुशल अगदी हुबेहूब सिद्धार्थ जाधवची भूमिका साकारतो. त्याचा अभिनय पाहून सगळे त्याचे कौतुक करतात. पद्यावरील सिद्धार्थचा बाथटबमधील फोटो पाहून कुशल टॅपात बसतो. (Latest Entertainment News)

त्यानंतर फोटो काढता काढता सेट पडतो. त्यावर नीलेश साबळे (अभिजीत बिचुकले) त्याला विचारतो, 'इतके फोटो काढायची काय गरज आहे.' या सगळ्यावर कुशल म्हणतो, ',माझा एका व्यक्तीवर राग आहे. मी कुठेही गेलो तरी माझा एकच फोटो लावतात.'

कुशल म्हणजेच सिद्धार्थचा राग असलेला फोटो असतो 'खोखो' चित्रपटातील. ज्यात तो अंगाला पाने लावून आदिमानवाची भूमिका साकारत आहे.

कुशल बद्रिकेच्या या व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याच्या या व्हिडिओ नेटकरी कमेंट करत आहेत. तसेच त्याचे कौतुक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री अपघाताचा थरार! भरधाव कारने आधी संरक्षण भिंत तोडली, पुलावरून थेट खड्ड्यात पडली, तिघांचा मृत्यू

Veen Doghatli Hi Tutena : अखेर तो क्षण आला; समर-स्वानंदी समोरासमोर, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा

Ganesh Chaturthi 2025: चतुर्थीला कधी आहे गणेश स्थापनेचा मुहूर्त? जाणून घ्या स्थापनेची योग्य विधी

Whatsapp New Feature: तुम्हाला मिळालेली माहिती खरी की खोटी? Whatsapp देणार खात्री, जाणून घ्या नवं फिचर

SCROLL FOR NEXT