krrish 4 SAAM TV
मनोरंजन बातम्या

krrish 4 : प्रियांका अन् कंगनाला बाजूला सारून 'क्रिश ४'मध्ये 'या' अभिनेत्रीची वर्णी? स्वतः दिली हिंट

krrish 4 Update : नवीन वर्षात अनेक मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या यादीत 'क्रिश ४' या चित्रपटाचा देखील समावेश आहे. सध्या या चित्रपटात कोणती अभिनेत्री हृतिक रोशनसोबत स्क्रीन शेअर करणार, याची चर्चा पाहायला मिळत आहे. यासंबंधी एक खास अपडेट समोर आली आहे.

Shreya Maskar

नवीन वर्षात अनेक मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यांसाठी चाहते देखील खूप उत्सुक आहेत. खूप काळापासून सर्वत्र सोशल मीडियावर 'क्रिश 4' (krrish 4) चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशनसोबत कोण स्क्रीन शेअर करणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. आता यासंबंधी एक खास अपडेट समोर आली आहे.

'क्रिश'ची सिरीज चाहत्यांना खूप आवडली. 'क्रिश 4'ची घोषणा झाल्यापासून चाहते चित्रपटासाठी उत्सुक आहेत. चित्रपटाच्या कथेकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. 'क्रिश 4'मध्ये हृतिक रोशन (Hrithik Roshan) क्रिशची भूमिका साकारेल. मात्र प्रेक्षक अभिनेत्री कोण? हे जाणून घेण्यास आतुर आहेत. 'क्रिश 4'मध्ये अभिनेत्री म्हणून खूप काळापासून बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचे नाव चर्चेत आहे.

बॉलिवूडची ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) आहे. आता तर स्वतः श्रद्धा कपूरने यासंबंधी एक हिंट चाहत्यांना दिली आहे. श्रद्धाने एका मुलाखतीत सांगितले की, नवीन वर्षात जानेवारी महिन्यात श्रद्धा कपूरचा नवीन चित्रपट येणार आहे. यावर नेटकऱ्यांनी तो 'क्रिश 4' असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे एका मुलाखतीत राकेश रोशन यांनी 'क्रिश 4' जानेवारी 2025 मध्ये येणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही कोणती अधिकृत घोषणा झाली नाही.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. हृतिक रोशन अभिनयासोबतच एक उत्तम डान्सर देखील आहे. आजवर 'क्रिश'चे तीन भाग झाले आहेत. या तिन्ही भागांमध्ये क्रिशची भूमिका हृतिक रोशन यांनी साकारली आहे. त्यांनी त्यात सुपरहीरो बनून चाहत्यांचे भन्नाट मनोरंजन केले आहे. आता 2025 मध्ये हृतिक रोशनचा 'क्रिश 4' हा चित्रपट भेटीला येणार आहे.

अलिकडेच श्रद्धा कपूर 'स्त्री2' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 'क्रिश' चित्रपट 2006ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यात बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पाहायला मिळाली होती. तर 'क्रिश 3'मध्ये प्रियंकासोबत अभिनेत्री कंगना राणौत झळकली होती. हे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले होते. आता चाहत्यांना 'क्रिश 4'ची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan- Shilphata Road: कल्याण-डोंबिवलीकरांची ट्रॅफिकमधून सुटका, पलावा पूल आजपासून सुरू

Sushil Kedia Controversy : मराठी शिकणार नाही म्हणणारे सुशील केडिया घाबरले; पोलिसांकडे केली सुरक्षेची मागणी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे अमित शहांसमोर लाचार झाले, ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल|VIDEO

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

SCROLL FOR NEXT