taapsee pannu  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Taapsee Pannu : KRK ने केले असे ट्विट की तापसी पन्नूला आला राग ; म्हणाली 'किती मूर्ख आहेत हे लोक'

बॉलिवूडवर बहिष्कार टाकणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना तापसी पन्नू म्हणाली की, 'टीकाकरांनी प्रेक्षकांना कमी लेखू नये'.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूच्या(Taapsee Pannu) 'दोबारा' (Dobaaraa) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले असूनही अनेक लोक विनाकारण चित्रपटाला टार्गेट करत आहेत. बॉलिवूडवर बहिष्कार टाकणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना तापसी म्हणाली की, 'टीकाकरांनी प्रेक्षकांना कमी लेखू नये'.

वास्तविक, केआरकेच्या ट्विटवर तापसी पन्नूने प्रतिक्रिया दिली आहे. अनुराग कश्यप दिग्दर्शित या चित्रपटाने आतापर्यंत ७२ लाखांची कमाई केली आहे. निर्माता हंसल मेहताने 'दोबारा' चित्रपटाचा बचाव करत ट्विट केले असून त्यावर टिप्पणी करत तापसी पन्नूने केआरकेवर निशाणा साधला आहे.

तापसीने कमाल आर खानला उत्तर दिले, 'सर, लोकांनी कितीही खोटे बोलले तरी ते सत्य होणार नाही. चित्रपटांना नाव ठेवणारी ही लोक फक्त इंडस्ट्रीचे नुकसान करण्याचा प्रयत्न करत आहेत. ही लोक किती मूर्ख आहेत याची कल्पना करा. अशा लोकांना 'दोबारा' हा चित्रपट समजणे थोडे अवघड आहे, तुम्ही अशा लोकांना दोष देऊ शकता का?'

निर्माता हंसल मेहताने, कमाल रशीद खान आणि रोहित जैस्वाल यांच्या ट्विटचा स्क्रीनशॉट पोस्ट करत ट्विट केले की, 'दोबारा' या चित्रपटाने ३७० स्क्रीन्सवरून ७२ लाख कमावले आहेत, जे एक चांगले कलेक्शन आहे. हे स्वयंघोषित टीकाकार आहेत जे चित्रपटांचा प्रेक्षकांवर वाईट परिणाम करणाऱ्या प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : अब्दुल सत्तारांचे प्रस्ताव फेटाळले; भूखंड देण्याबाबत औद्योगिक विकास महामंडळाला दिला होता प्रस्ताव

Maharashtra News Live Updates: रश्मी शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

Voter ID जवळ नाही, टेन्शन सोडा, तरीही मतदान करता येणार, ही १२ कागदपत्रेही आहेत ग्राह्य

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Pune Politics: मतदानापूर्वीच पुण्यात मनसेला खिंडार, अनेक पदाधिकाऱ्यांनी 'तुतारी' घेतली हाती

SCROLL FOR NEXT