Ankita Walawalkar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ankita Walawalkar : पहात रहावे... 'कोकण हार्टेड गर्ल'चं रोमँटिक प्री वेडिंग शूट, पाहा VIDEO

Ankita Walawalkar Pre Wedding Shoot : 'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर आता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या रोमँटिक प्री वेडिंग शूटची झलक तिने चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

Shreya Maskar

सोशल मिडिया इन्फ्लुएंसर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. 'कोकण हार्टेड गर्ल'च्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 'बिग बॉस मराठी 5' मधून अंकिता वालावलकरला खूप लोकप्रियता मिळाली आहे. अंकिताच्या घरी लगीनघाई पाहायला मिळत आहे. अंकिता संगीतकार कुणाल भगतसोबत लग्न करणार आहे.

कुणाल भगत आजवर अनेक गाजलेली गाणी संगीतबद्ध केली आहे. मात्र अद्यापही अंकिता आणि कुणालच्या लग्नाची तारीख समोर आली नाही आहे. अशात नुकताच अंकिताने आपल्या प्री वेडिंगची एक झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. अंकिता आणि कुणालच्या प्री वेडिंग शूटचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आला आहे. अंकिताने समुद्रकिनारी रोमँटिक प्री वेडिंग शूट केले आहे. तिने प्री वेडिंगची झलक दाखवणारा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये दोघे खेळताना आणि एकमेकांचा हात हातात घेऊन समुद्रकिनारी चालताना आणि बोटीतून फिरताना दिसत आहेत. हे रोमँटिक फोटोशूट सिंधुदुर्गमधील मालवणमध्ये पार पडले आहे. अंकिताने व्हिडीओला एक खास कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "भातुकलीचा खेळ रंगतोय…..पण काय असेल मनात? एक आगळं वेगळं प्री वेडिंग"

प्री वेडिंग व्हिडीओमध्ये कोकणाचे सुंदर सौंदर्य अनुभवता येत आहे. निळाशार समुद्र किनारा आणि नारळाच्या बागा पाहायला मिळत आहे. अंकिता आणि कुणाल देखील एकमेकांत मग्न पाहायला मिळत आहेत. अंकिता आणि कुणालचा रोमँटिक अंदाज चाहत्यांना खूप आवडला आहे. त्यांच्या फोटो आणि व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News: रायगड जिल्‍ह्यात आज सलग सहाव्‍या दिवशी पावसाची संततधार

US-India Tarrif War: कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवलं; अमेरिकेच्या टॅरिफ बॉम्बनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Horoscope Wednesday: कोणाच्या नशिबात धनलाभ, तर कोणाला आरोग्याची काळजी? वाचा बुधवारचे राशीभविष्य

मोनो रेलमध्ये २०० प्रवासी अडकले; प्रवाशांचा श्वास गुदमरला, भरपावसात रेस्क्यू ऑपरेशन, व्हिडिओ व्हायरल

ITR 2025 : आयटीआर परतावा कमी का मिळतोय? जाणून घ्या खरं कारण

SCROLL FOR NEXT