Sonu Nigam Viral Reaction Saam Tv
मनोरंजन बातम्या

Sonu Nigam: मार खाण्याची कामं...; सोनू निगमच्या कॉन्सर्टमध्ये चाहता अचानक स्टेजवर चढला, कोल्हापूरमध्ये गायकासोबत काय घडलं?

Sonu Nigam Viral Reaction: कोल्हापूरमधील लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान चाहत्याने स्टेजवर धाव घेत सोनू निगमच्या पाया पडल्या. गायकाने शांतपणे परिस्थिती हाताळत चाहत्यालाच गाण्याची संधी दिली.

Shruti Vilas Kadam

Sonu Nigam Viral Reaction: प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या कोल्हापूरमधील लाईव्ह कॉन्सर्टमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्यक्रम सुरू असताना अचानक एक चाहता स्टेजवर चढून सोनू निगमच्या पाया पडला. या अनपेक्षित प्रकारामुळे काही क्षणांसाठी कार्यक्रम थांबला, मात्र सोनू निगमने अत्यंत शांत आणि संयमाने ही परिस्थिती हाताळल्याने नेटकऱ्यांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सोनू निगम गाणं सादर करत असताना अचानक एक चाहता स्टेजवर येताना दिसतो. त्याने गायकाच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतो. यावेळी बॉडीगार्ड तिथे आले त्यांनी त्या चाहत्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सोनू निगमने बॉडीगार्डंना थांबवत परिस्थिती शांत केली. इतकेच नाही, तर त्यांनी त्या चाहत्याला माईक देत काही ओळी गाण्याची संधीही दिली.

या घटनेचा व्हिडिओ स्वतः सोनू निगम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. व्हिडिओसोबत त्यांनी, “मार खाण्यासारखी काम का करता? यावेळी मी तुम्हाला वाचवलं, पण प्रत्येक वेळी मी तुम्हाला वाचवू शकणार नाही. ,” असे कॅप्शन लिहिले. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका नेटकऱ्याने कमेंट केली, "ही परिस्थिती अशा प्रकारे फक्त तुम्हीच हाताळू शकला असता." दरम्यान, दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, "जेव्हा एखादा कलाकार रंगमंचावर असतो, तेव्हा परवानगीशिवाय मध्येच व्यत्यय आणणे हा एक अपराधच मानला गेला पाहिजे... परवानगीशिवाय रंगमंचावर जाणे ही चाहत्यांच्या बाजूने अत्यंत चूकीची गोष्ट आहे. आणखी एकाने कमेंट केली असं कधी करु नये यामुळे तुम्हाला डायरेक्ट मार पडू शकतो.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT