Arjun Kapoor And Malaika Arora Saam Tv
मनोरंजन बातम्या

Koffee With Karan 8: मलायका अरोरासोबत लग्न कधी करणार?, 'कॉफी विथ करण'मध्ये उत्तर देताना अर्जुन कपूरने दिली हिंट

Arjun Kapoor And Malaika Arora: 'कॉफी विथ करण 8'मध्ये अर्जुन कपूरने हजेरी लावली. यावेळी तो मलायकासोबतच्या नात्यावर खुलेपणाने बोलला. यासोबतच मलायकासोबत कधी लग्न करणार हेही त्याने सांगितले.

Priya More

Koffee With Karan 8 New Promo:

बॉलिवूडची (Bollywoood) प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) हे बॉलिवूडमधील सर्वांचे आवडते कपल आहे. मलायका आणि अर्जुन बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेकदा त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या पण त्या अफवा ठरल्या.

आता नुकताच अर्जुन कपूरने मलायका अरोरासोबतच्या नात्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. 'कॉफी विथ करण 8'मध्ये अर्जुन कपूरने हजेरी लावली. यावेळी तो मलायकासोबतच्या नात्यावर खुलेपणाने बोलला. यासोबतच मलायकासोबत कधी लग्न करणार हेही त्याने सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बॉलिवूड (Bollywood) चित्रपट निर्माता करण जोहरचा टॉक शो 'कॉफी विथ करण 8' (Koffee With Karan 8) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये बॉलिवूडमधील अनेक स्टार सेलिब्रिटींनी आतापर्यंत हजेरी लावली. या शोला प्रेक्षकांकडून देखील खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. अशामध्ये आता या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि अर्जुन कपूर (Arjun Kapoor) यांनी एकत्र हजेरी लावली. यावेळी दोघांनी देखील आपल्या पर्सनल आणि लव्ह लाइफबद्दल अनेक खुलासे केले.

करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' या चॅट शोमध्ये करणने अर्जुनला विचारले की, 'मलायका तुझ्यापेक्षा 9 वर्षांनी मोठी आहे. अनेक वेळा ऑनलाइन नकारात्मकता आणि ट्रोलचा परिणाम नातेसंबंधांवर होतो का?' यावर प्रतिक्रिया देताना अर्जुन म्हणाला की, 'अशी कोणतीही गोष्ट नाही जिचा परिणाम आमच्या नात्यावर होत नाही. आम्हाला फक्त दररोज सामोरे जावे लागेल. हे सर्व लोक फक्त तुमचे लक्ष वेधण्यासाठी अशा कमेंट करतात.'

यादरम्यान, करणने अर्जुन कपूरला मलायका अरोरासोबत लग्न करण्याच्या प्लॅनबद्दल प्रश्न विचारतो. तर अर्जुने सांगितले की, 'मी योग्य वेळी मलायकाशी याबद्दल बोलेल.' यानंतर करणने विचारले की, 'तुला येथे सत्य सांगायचे आहे का?' यावर अर्जुन म्हणाला, 'मला वाटते की सर्वात आदराची गोष्ट म्हणजे जेव्हा आम्ही त्या ठिकाणी पोहोचू आणि त्याबद्दल एकत्र बोलू. नात्यात मी खूप आनंदी आहे. या कंफर्टपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही खूप संघर्ष केला आहे. सध्या मला याविषयी काही बोलायचे नाही. कारण एकट्याने बोलणे योग्य नाही.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT