Nagarjuna Property  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nagarjuna Property : ३०५० कोटींचा मालक, सुपरस्टार नागार्जुन एका चित्रपटासाठी 'इतकं' मानधन घेतो!, आकडा अवाक् करणारा...

Shreya Maskar

तमिळ इंडस्ट्रीत नागार्जुन अक्किनेनी (Nagarjuna Akkineni) यांचा सर्वत्र जलवा पाहायला मिळत आहे. सुपरस्टार नागार्जुन हा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नागार्जुनची डॅशिंग स्टाईल खूप प्रसिद्ध आहे. सर्वात श्रींमत व्यक्तींमध्ये नागार्जुनने आपले स्थान मिळवले आहे. दक्षिण भारतातील अनेक अभिनेत्यांना मागे टाकून नागार्जुनने श्रीमंतांच्या यादीत आपलं स्थान पक्कं केलं आहे.

नागार्जुन यांनी अभिनयासोबत स्पोर्ट्स आणि रिअल इस्टेट यांसारख्या क्षेत्रात देखील मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र त्यांची चर्चा सुरू आहे. नागार्जुनचे हे यश सर्वांना थक्क करून टाकणारे आहे. त्यांनी आपल्या श्रीमंतीने अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांना मागे टाकले. या यादीमध्ये रजनीकांत ,कमल हसन , चिरंजीवी आणि प्रभास या अभिनेत्यांचा समावेश आहे. नागार्जुन ३०५०कोटीचे मालक आहेत.

तेलगु बिग बॅास होस्ट करण्यासाठी नागार्जुन याने अनेक कोटी रुपये घेतले आहे. तसेच नागार्जुन एका चित्रपटाचे २५ कोटी रुपये घेतात. ज्यामुळे त्यांचे नाव संपूर्ण भारतातील श्रीमंतांच्या यादीत समाविष्ट झाले आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्या मालकीचा स्टुडिओ असून ते एक चित्रपट निर्मातेसुद्धा आहेत. नागार्जुन हा N3 रियल्टी एंटरप्रायझेस ज्याचे मूल्य सुमारे 800 कोटी रुपये आहे. हा व्यवसाय मोठ्या स्टार्सच्या संपत्तीपेक्षा ही जास्त आहे.

अभिनेता नागार्जुन लक्झरी आयुष्य जगत आहे. अनेक महागड्या वस्तू त्यांच्याकडे आहेत. यामध्ये एक खाजगी जेट, आलिशान कार आणि हैदराबादमधील ४० कोटी किंमतीचा अलिशान बंगला देखील आहे. नागार्जुन हा हैदराबादमधील अन्नपूर्णा इंटरनॅशनल स्कूल ऑफ फिल्म अँड मीडियाचा अध्यक्ष आहे. नागार्जुनला अभिनयाच्या कारकिर्दीत अनेक पुरस्कार मिळाले आहे. त्यांनी तेलगु आणि हिंदी अशा दोन्ही चित्रपटांमधून उत्तम अभिनय करून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather: गणेश विसर्जनानंतर राज्यात पावसाची एन्ट्री! आज 'या' भागात बरसणार, हवामान खात्याचा अंदाज; वाचा सविस्तर...

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

SCROLL FOR NEXT