South famous actress Samantha Ruth Prabhu  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Samantha Ruth Prabhu: समांथा 'या' विशेष आजाराने ग्रस्त, सोशल मीडियावरील पोस्टने चर्चेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Samantha Prabhu Diagnosed Myositis: समंथा प्रभू दाक्षिणात्य सुपरस्टार सध्या एका कारणामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. तिला मायसोटिस नावाच्या आजाराचे निदान झाल्याचे उघडकीस आले आहे. सोबतच तिचा नुकताच एक नवा कोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वी 'यशोदा' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, त्या ट्रेलरवरील सर्व प्रतिक्रिया पाहत समंथाने सर्वांचेच आभार मानलेत.

तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट करत लिहिले की, 'यशोदाच्या ट्रेलरवर तुमची प्रतिक्रिया जबरदस्त होती. हे प्रेम आणि कनेक्शन आहे जे मी तुम्हा सर्वांसोबत शेअर करतेय आणि तेच मला जीवनातील आव्हानांना तोंड देण्याचे सामर्थ्य देते.'

हॉस्पिटलमधील एक फोटो शेअर करत समंथाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'काही महिन्यांपूर्वी मला मायोसिटिस नावाचा ऑटोइम्यून आजार (samantha autoimmune condition) झाल्याचे स्पष्ट झाले. पण माझ्या अपेक्षेपेक्षा थोडा जास्त वेळ घेत आहे.

तसेच समंथा पुढे म्हणते की, तिच्या डॉक्टरांना विश्वास आहे की ती लवकरच पूर्ण बरी होईल. तसेच ती म्हणाली, 'माझ्या आयुष्यात चांगले-वाईट क्षण आले आहेत. शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या... ही वेळ ही निघून जाईल.

मायोसिटिस म्हणजे काय?

मायोसिटिस नावाच्या या आजारात प्रतिकार शक्ती आपल्या शरीराच्या स्नायूंवर थेट परिणाम करते. या आजारात स्नायू दुखणे, थकवा येणे, खाणे-पिण्यावर परिणाम, श्वसनाचा त्रास दिसतो. ज्यामुळे जळजळ, सूज, वेदना आणि कमकुवतपणा येतो. महिला- पुरुषांसोबत लहान मुलांनाही हा आजार उद्भवू शकतो.

मायोसोटिस या आजाराचे एकूण पाच प्रकार असून त्याचे लक्षणे पुढीलप्रमाणे

डर्माटोमायोसिटीस, इन्क्लुजन-बॉडी, जुवेनाईल मायोसिटिस, पॉलिमायोसिटिस आणि टॉक्सिक मायोसिटिस असे एकूण मायोसिटिसचे पाच प्रकार आहेत.

१. डर्माटोमायोसिटीस या आजाराने चेहरा, छाती, मान आणि पाठीवर जांभळ्या- लाल रंगाची पुरळ उठते. खडबडीत त्वचा, थकवा, स्नायू कमकुवतपणा, स्नायू दुखणे, वजनात घट, अनियमित हृदयाचे ठोके हे लक्षण दिसून येतात.

२. इन्क्लुजन-बॉडी मायोसिटिसमध्ये ५० वर्षांहून अधिक स्त्रियांपेक्षा पुरुष सर्वाधिक प्रभावित करते. या आजारात स्नायुमध्ये कमकुवतता आणि दुखणे हे सर्वाधिक लक्षणे दिसून येते.

३. जुवेनाईल मायोसिटिस हा आजार लहान मुलांपेक्षा मुलींमध्ये सर्वाधिक दिसून येतो. यावेळी लाल-जांभळी पुरळ, थकवा, अस्थिर मूड, ओटीपोटात दुखणे, बसलेल्या स्थितीतून उठण्यास त्रास होणे, स्नायू कमकुवत होणे, सांधेदुखी हे लक्षणं दिसुन येतात.

४. पॉलिमायोसिटिस आजाराची सुरुवात स्नायू कमकुवत होण्यापासून सुरु होते. या आजाराचा प्रभाव सर्वाधिक या स्नायूंवर होतो. स्नायू कमकुवत होणे आणि दुखणे, अन्न गिळताना घसा दुखणे, संतुलनाची समस्या, कोरडा खोकला, हातावरची त्वचा जाड होणे, चालताना थाप लागणे, वजनात घट, ताप येणे हे या आजाराचे लक्षण आहे.

५. टॉक्सिक मायोसिटिस होण्याचे कारण निर्धारित औषधं आणि बेकायदेशीर औषधांच्या अतिसेवनामुळे हा आजार उद्भवु शकतो. स्टॅटिनसारख्या कॉलेस्ट्रॉलच्या औषधांमुळे आजार उद्भवण्याची शक्यता आहे.

कारणे

या आजाराचे निदान आव्हानात्मक असल्याने याचे लक्षणं अधूनमधून दिसतात. लक्षणांची सुरुवात अचानक किंवा हळूहळू होऊ शकते. प्राथमिक लक्षणांमध्ये थकवा, अन्न गिळण्यासाठी त्रास होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश असू शकतो.

उपचार

नॅशनल हेल्थ सर्व्हिस (यूके) नुसार, मायोसिटिसचा उपचारांचा कोणताही विशिष्ट कोर्स नाही. इन्क्लुजन-बॉडी मायोसिटिस (IBM) च्या बाबतीत व्यायाम आणि योगासनांद्वारे आजार बरा केला जाऊ शकतो. स्टिरॉइड्स पॉलिमायोसिटिस आणि डर्माटोमायोसिटिस स्थितींवर उपचार करण्यास मदत करतात. कॉर्टिकोस्टेरॉइड्स नावाचे औषध घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dussehra Melava 2024 Live Updates: आदित्य ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंची मिमिक्री

Dasara Melava: फडणवीसांनी जातीय द्वेष पसरवला; सरसंघचालकांनी देवेंद्र फडणवीसांचे कान उपटावेत, सुषमा अंधारेंची घणाघाती टीका

Sushma Andhare : 'लाडक्या बहिणींनी १५०० रुपये कचकचून घ्यावे, पण...'; दसरा मेळाव्यात सुषमा अंधारे कडाडल्या, VIDEO

Hong Kong Super Sixes साठी टीम इंडियाची घोषणा! केव्हा, कुठे अन् कधी रंगणार सामने? इथे पाहा LIVE

IND vs BAN 3rd T20I: टीम इंडियाने प्लेइंग ११ मध्ये १ बदल केला, पण Harshit Rana ला बसवलंं; BCCI ने कारणही सांगितलं

SCROLL FOR NEXT