KKBKKJ 1st Day Box Office Collection Saam Tv
मनोरंजन बातम्या

KKBKKJ 1st Day Collection: प्रदर्शनापूर्वी हवेत उडणाऱ्या भाईजानचा KKBKKJ प्रदर्शनानंतर आपटला?, चित्रपटाने पहिल्या दिवशी केली फक्त इतकी कमाई...

चार वर्षांनंतर सलमान खान ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चित्रपटाने पहिल्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली जाणू घेऊया...

Chetan Bodke

KKBKKJ 1st Day Box Office Collection: फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी की भाई किसी की जान’ या चित्रपटाची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. २१ एप्रिलला बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेला हा चित्रपट चार वर्षांनंतर ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चार वर्षांनंतर सलमान खान ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून चित्रपटाने पहिल्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली जाणू घेऊया...

चित्रपटाने हैदराबाद वगळता इतर शहरांमध्ये चांगली कामगिरी केली नाही. पण मुंबई, बंगळुरूसारखी कामगिरी हैदराबादमध्ये पाहायला मिळाली नाही. उत्तरप्रदेश, बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेशमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, KKBKKJ ने पहिल्या दिवशी तब्बल १४ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये ओपनिंगचे आकडे फारसे दिलासादायक नव्हते. निर्मात्यांना चित्रपट पहिल्या दिवशी किमान १५ कोटींचा टप्पा पार करेल अशी आशा होती. (Bollywood Film)

चित्रपटाला विशेषत: मोठ्या मल्टिप्लेक्समध्ये कलेक्शन सुधारण्याची गरज आहे कारण मोठ- मोठ्या थिएटरमध्ये चित्रपटाची कमाई खूपच मंदावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दिवशी चित्रपटाच्या कमाईबद्दल जे आकडे आले आहेत ते सलमान खानच्या स्टार पॉवरमुळे आले आहेत. चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जवळपास एक ते दिड कोटींची कमाई केली असली तरी त्याचा पहिल्या दिवशी काहीही फरक पडलेला नाही.

‘किसी की भाई किसी की जान’ चे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले असून, चित्रपटात सलमान खान, पूजा हेगडे, व्यंकटेश, भूमिका चावला, जगपती बाबू, राघव जुयाल, जस्सी गिल, सिद्धार्थ निगम, शहनाज गिल, पलक तिवारी, विनाली भटनागर, विजेंदर सिंग आणि सतीश कौशिकही आहेत. २०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीरम’ या तमिळ सिनेमाचा हा हिंदी रिमेक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: लंडनमधील कोट्यवधींची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS ऑफिसर दिव्या मित्तल यांची यशोगाथा

Viral Video: बाईक की टेम्पो! दुचाकीवरून ८ जणांचा प्रवास, पोलिसांनी जोडले हात, व्हिडीओ पाहून हैराण व्हाल!

PM Awas Yojana: PM आवाससाठी आता पोर्टलवरून अर्ज! १.८० लाखांची सबसिडी मिळणार, प्रक्रिया आणि कार्यप्रणाली कशी आहे?

Ajit Pawar : ताईंना CM करण्यासाठी अजित पवारांना बदनाम केलं, फडणवीसांचा आरोप, सुप्रिया सुळेंचा पलटवार

Shani Margi 2024: शनीच्या मार्गी चालीने अडचणी वाढणार; 'या' राशींवर राहणार शनिदेवाचं सावट!

SCROLL FOR NEXT