Kiran Mane Share Post For Shah Rukh Khan  Saam TV
मनोरंजन बातम्या

Kiran Mane On Shah Rukh Khan: 'नमस्कार करत नाही, 'सलाम' करतो...' शाहरुख खानचा व्हिडीओ शेअर करत किरण मानेंनी केलेली पोस्ट चर्चेत

Kiran Mane Post: किरण माने यांनी पुन्हा एकदा शाहरुख खानसाठी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.

Pooja Dange

Kiran Mane Share Shah Rukh Khan Old Video:

'बिग बॉस मराठी ४'मुळे अभिनेते किरण माने पुन्हा प्रसिद्धी झोतात आले. सोशल मीडियावरील किरण माने यांची प्रत्येक पोस्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेते. 'जवान' प्रदर्शित होण्याआधी किरण माने यांनी शाहरुखानसाठी खास पोस्ट केली होती. तेव्हा अनेकांच्या लक्षात आलं की किरण माने 'शाहरुख खान'चे जबरा फॅन आहेत.

किरण माने यांनी पुन्हा एकदा शाहरुख खानसाठी त्यांच्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. किरण माने यांनी शाहरुख खानचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

किरण माने यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शाहरुख खान आणि दाक्षिणात्य अभिनेते मोहनलाल दिसत आहेत. व्हिडीओमध्ये शाहरुख खान स्टेजवर येताना दिसत आहे. तसेच त्याच्या कपाळावर टिका लावला आहे. त्यानंतर त्याला मोठा हार घालण्यात आला आहे. मोहनलाल यांनी शाहरुखला शाल भेट दिली. त्यानंतर शाहरुख खानने मोहनलाल यांनी वाकून नमस्कार केला. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल किरण माने यांनी हा व्हिडीओ का पोस्ट केला.

किरण माने यांनी कॅप्शनमध्ये याविषयी सांगितले आहे. 'न झुकता पाठीचा कणा कुठं ताठ ठेवायचा आणि कुठं नम्रपणे झुकायचं, हे ज्याला कळलं... त्यानं जग जिंकलं ! परवा एका सी ग्रेड सिनेमा दिग्दर्शकाचा इंटरव्ह्यू पाहिला, ज्यात तो सांगत होता शाहरूख कधी कुणाला नमस्कार करत नाही, 'सलाम' करतो... आणि हा प्रसंग डोळ्यापुढे आला. आजकाल असत्य पेरून नफरत पसरवणारे सुमार दर्जाचे कलावंत मराठीतही आहेत आणि हिंदीतही. अशांनी गढुळ केलेल्या कलाक्षेत्रात शाहरूखसारखे लोक 'प्युरीफायर' आहेत. लब्यू SRK.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT